AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका व्यक्तीमुळे भुवनेश्वर कुमारचा कमबॅक लांबला, जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच बसेल धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारचे संघात कमबॅक झाला आहे. पण आता भुवनेश्वर कुमारचा इतके दिवस कमबॅक न होण्यामागे एक व्यकती जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

एका व्यक्तीमुळे भुवनेश्वर कुमारचा कमबॅक लांबला, जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच बसेल धक्का
| Updated on: Oct 07, 2026 | 10:16 AM
Share

अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने जवळपास चार वर्षांनंतर मंगळवारी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. आयपीएल आणि देशांतगर्त सामन्यातील कामगिरीमुळे आता भुवनेश्वरची संघात एन्ट्री झाली आहे. पण इतके दिवस हा स्टार गोलंदाज बाहेर का होता यामागचे कारण आता समोर आले आहे.

भुवनेश्वरच्या संघात समावेशासाठी मध्य विभागाचे निवडकर्ते रुद्र प्रताप सिंग यांना फारसा पाठिंबा मिळाला नाही. मात्र, आगरकर यांच्या जाण्यानंतर, विशेषतः जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, हंगामी मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा आणि निवड समितीच्या इतर सदस्यांना पटवून देणे कठीण नव्हते. भुवनेश्वर आपल्या अनुभवाने मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांसारख्या तरुण वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शनही करू शकतो. या दोघांकडे २०२८ च्या टी-२० विश्वचषकासाठी संभाव्य दावेदार म्हणून पाहिले जात आहे. भुवनेश्वरने २१ कसोटी आणि १२१ एकदिवसीय, तसेच ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून ९० बळी घेतले आहेत.

दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर राहिलेला वरुण चक्रवर्ती संघात परतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत खेळणाऱ्या टी-२० संघातील बहुतेक खेळाडूंची निवड जवळपास निश्चित होती, परंतु भुवनेश्वरच्या पुनरागमनामुळे मोहम्मद शमीला संंधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडमध्ये पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे, तर दुसरा सामना २४ ऑक्टोबर रोजी त्याच शहरात खेळला जाईल.

तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २७ ऑक्टोबर रोजी वेलिंग्टन येथे, तर चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे खेळला जाईल. टी-२० मालिकेनंतर, भारत न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने खेळेल.

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी-२० संघ:

श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सैमसन, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा