TV9 नेटवर्ककडून न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेची घोषणा, जाणून घ्या A टू Z माहिती एका क्लिकवर
टीव्ही 9 नेटवर्कने पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांच्या प्रतिष्ठित बॅडमिंटन अकादमीसोबत मिळून न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेची घोषणा केली आहे.

टीव्ही 9 नेटवर्कने पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांच्या प्रतिष्ठित बॅडमिंटन अकादमीसोबत मिळून न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेची घोषणा केली आहे. यापूर्वी टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं कॉर्पोरेट फुटबॉल कपचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ही स्पर्धा म्हणजे कॉर्पोरेट फुटबॉल कपच्या पुढचं पाऊल आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा नसून, भारतात कार्यरत असलेल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये फिटनेस, टीमवर्क, आणि जीवनाचं योग्य व्यवस्थापन या गोष्टी रुजवण्याचा आहे.
या स्पर्धेसंदर्भात बोलताना टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास म्हणाले की, आम्ही अशा खेळांना प्रोत्साहन देतो ज्यांचा उद्देश केवळ जिंकणं नाही तर त्या खेळांमधून आरोग्य, समृद्ध जीवन आणि सहकार्याची भावना जोपासली जाईल. फुटबॉल कपनंतर आता आम्ही बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या माध्यामातून आणखी एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन करत आहोत.
तर या स्पर्धेबाबत बोलताना टीव्ही 9 नेटवर्क साउथचे सीओओ आणि चॅम्पियनशिपचे संचालक विक्रम के.म्हणाले की “हैदराबाद हे तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्ससाठी ओळखले जाते, परंतु खेळामध्ये देखील या शहराचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा या शहरात आयोजित केली जात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. कॉर्पोरेट जग आता खेळाच्या माध्यमातून जोडलं जाणार आहे.
तर “बॅडमिंटनने मला सर्वकाही दिले आहे. आता मला कॉर्पोरेट जगतानेही या खेळाचा आनंद घ्यावा असे वाटते. ही स्पर्धा त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.” अशी भावाना यावेळी पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली आहे.
चॅम्पियनशिपची वैशिष्ट्ये
ही स्पर्धा हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये होणार आहे. जिथून पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत सारखे दिग्गज खेळाडूंचा उदय झाला.
प्रत्येक संघात ३ ते ५ खेळाडू असतील.
पुरुष गट: २ पुरुष एकेरी आणि १ पुरुष दुहेरी सामना
खुल्या गटात: १ महिला असलेला संघ, ज्यामध्ये २ पुरुष एकेरी आणि १ मिश्र दुहेरी सामना असेल.
एक कंपनी आपले कितीही संघ पाठवू शकते.
मात्र खेळाडू पाठवण्यासाठी ती कंपनी किमान दोन वर्ष जुनी असणं आवश्यक आहे. तसेच त्या कंपनीमध्ये किमान दहा कर्मचारी कार्यरत असावेत.
या स्पर्धेसाठी सहा लाख रूपयांपर्यंत बक्षीसं ठेवण्यात आली आहेत
पुलेला गोपीचंद अकादमी येथे 2 दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी www.news9corporatecup.com या वेबसाईटला भेट द्या
