Virat Anushka Daughter | ‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

अनुष्का शर्मा-विराट कोहलीला कन्यारत्न झालं आहे. विराटने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Virat Anushka Daughter | 'त्या' ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न
अनुष्का शर्मा-विराट कोहलीला कन्यारत्न

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushaka Sharma) कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विराट कोहलीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या निमित्ताने ज्योतिषीची भविष्यवाणी खरी ठरली आहे. अनुष्का शर्माला मुलगी होणार असल्याची भविष्यवाणी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषीने केलं होतं. (anushka sharma virat kohli gave birth to a daughter the prediction of an astrologer from bangalore came true)

या अशा महत्वाच्या क्षणी कुटुंबासोबत राहण्यासाठी विराट ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला होता. तेव्हापासून विराट अनुष्का शर्मासोबत होता.

भविष्यवाणी खरी ठरली

अनुष्काला मुलगीच होणार अशी भविष्यवाणी बंगळुरुच्या एका ज्योतिषीने केली होती. “विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”, असा दावा या ज्योतिषीने केला होता.

क्रिकेटर्सची पहिलं मुल मुलगी

क्रिकेटर्सबाबत बोलायचं झालं तर देश विदेशातील बड्या क्रिकेटर्सचं पहिलं मुल हे मुलगी आहे. मग सचिन तेंडुलकरची मुलगी सारा असो किंवा सौरव गांगुलीची मुलगी सना. इतकंच काय तर भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीलाही मुलगी आहे. तिचं नाव जिवा आहे. त्याशिवाय, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन या सर्वांचं पहिलं मुल हे मुलगी आहे

संबंधित बातम्या :

विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा

(anushka sharma virat kohli gave birth to a daughter the prediction of an astrologer from bangalore came true)

Published On - 4:39 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI