अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
अर्जेटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला आहे. ही घोषणा करताना त्याने भावूक पोस्ट लिहिली आहे.

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या या निर्णयामुळे तो पुन्हा कधी अर्जेटीनाच्या राष्ट्रीय संघात खेळताना दिसणार नाही. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. या सामन्यात अर्जेंटीनाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सलग दोनदा जेतेपद मिळवण्याचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेताना मेस्सी म्हणाला की, हा निर्णय घेताना मला खूप त्रास झाला आणि अजूनही होतोय, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. मी या जर्सीसाठी आणि देशासाठी माझे सर्वस्व पणाला लावले, आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरलेले नाही. आता संघात अनेक प्रतिभावान तरुण खेळाडू येत असून ते या जागेसाठी पात्र आहेत.
मेस्सीने निवृत्ती जाहीर करताना प्रेक्षक, कुटुंबिय आणि प्रशिक्षकांचे आभार मानले, मेस्सी म्हणाला की, मागच्या 20 वर्षांत तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. स्टेडियमच्या आतून मिळणाऱ्या तुमच्या पाठिंब्याची मला कायम आठवण येईल. आतापासून मी तुमच्यापैकीच एक असेन. माझ्या कुटुंबाचे आभार, त्यांनी या या अद्भुत, पण कठीण प्रवासात मला साथ दिली. प्रत्येक प्रशिक्षक, संघसहकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. ज्यांच्यासोबत मला हा प्रवास करण्याची संधी मिळाली. मी अविस्मरणीय आठवणी आणि क्षण माझ्यासोबत घेऊन जाईन.
लिओनल मेस्सीने अर्जेंटीनासाठी एकूण सामने 207 सामने खेळले आहे. अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. या कालावधीत त्याने अर्जेंटीनासाठी एकूण गोल 125 गोल मारले आहेत. अर्जेंटिनाचा ऑल-टाईम लीडिंग गोल स्कोअरर म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे. त्या्च्या फुटबॉल कारकिर्दीत एकदा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. इतकंच काय तर प्रतिष्ठेचा कोपा अमेरिका कप दोन वेळा जिंकला आहे. इतकंच काय तर बॅलन डी’ओर आठ वेळा मिळवला आहे. हा पुरस्कार इतक्यांचा मिळवणारा जगातील एकमेव खेळाडू आहे.
लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघासाठी पहिला सामना 17 ऑगस्ट 2005 रोजी खेळला होता. हा सामना हंगेरीविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा सामना फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये 20 जुलैला खेळला होता. यासह त्याचा 21 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. राष्ट्रीय संघातून निवृत्त झाला असली तरी क्लबसाठी सामने खेळताना दिसणार आहे.
