AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..

अर्जेटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला आहे. ही घोषणा करताना त्याने भावूक पोस्ट लिहिली आहे.

अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की.. Image Credit source: PTI
| Updated on: Aug 31, 2026 | 9:30 PM
Share

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  त्याच्या या निर्णयामुळे तो पुन्हा कधी अर्जेटीनाच्या राष्ट्रीय संघात खेळताना दिसणार नाही. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. या सामन्यात अर्जेंटीनाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सलग दोनदा जेतेपद मिळवण्याचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेताना मेस्सी म्हणाला की, हा निर्णय घेताना मला खूप त्रास झाला आणि अजूनही होतोय, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. मी या जर्सीसाठी आणि देशासाठी माझे सर्वस्व पणाला लावले, आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरलेले नाही. आता संघात अनेक प्रतिभावान तरुण खेळाडू येत असून ते या जागेसाठी पात्र आहेत.

मेस्सीने निवृत्ती जाहीर करताना प्रेक्षक, कुटुंबिय आणि प्रशिक्षकांचे आभार मानले, मेस्सी म्हणाला की, मागच्या 20 वर्षांत तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. स्टेडियमच्या आतून मिळणाऱ्या तुमच्या पाठिंब्याची मला कायम आठवण येईल. आतापासून मी तुमच्यापैकीच एक असेन. माझ्या कुटुंबाचे आभार, त्यांनी या या अद्भुत, पण कठीण प्रवासात मला साथ दिली. प्रत्येक प्रशिक्षक, संघसहकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. ज्यांच्यासोबत मला हा प्रवास करण्याची संधी मिळाली. मी अविस्मरणीय आठवणी आणि क्षण माझ्यासोबत घेऊन जाईन.

लिओनल मेस्सीने अर्जेंटीनासाठी एकूण सामने 207 सामने खेळले आहे. अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. या कालावधीत त्याने अर्जेंटीनासाठी एकूण गोल 125 गोल मारले आहेत. अर्जेंटिनाचा ऑल-टाईम लीडिंग गोल स्कोअरर म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे. त्या्च्या फुटबॉल कारकि‍र्दीत एकदा फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. इतकंच काय तर प्रतिष्ठेचा कोपा अमेरिका कप दोन वेळा जिंकला आहे. इतकंच काय तर बॅलन डी’ओर आठ वेळा मिळवला आहे. हा पुरस्कार इतक्यांचा मिळवणारा जगातील एकमेव खेळाडू आहे.

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघासाठी पहिला सामना 17 ऑगस्ट 2005 रोजी खेळला होता. हा सामना हंगेरीविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा सामना फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये 20 जुलैला खेळला होता. यासह त्याचा 21 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. राष्ट्रीय संघातून निवृत्त झाला असली तरी क्लबसाठी सामने खेळताना दिसणार आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप