Ind Vs Sa : अर्शदीप सिंग-दीपक चहरने वाढवला सीनियर्सचा ताण, जाणून घ्या कारण

अर्शदीप सिंहने पहिल्या ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या, तसेच दीपक चाहर एका बाजून भेदक गोलंदाजी सुरु ठेवली.

Ind Vs Sa : अर्शदीप सिंग-दीपक चहरने वाढवला सीनियर्सचा ताण, जाणून घ्या कारण
Arshdeep singh
Image Credit source: PTI
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 29, 2022 | 8:02 AM

काल झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (SA) पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला. पहिल्यांदा फलंदाजी करीत असताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी (Bowler) पटापट बाद केल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभा करता आली नाही.

आशिया चषकात गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला आशिया चषकातून बाहेर पडावे लागले होते. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध महत्त्वाच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई झाली. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलीचं टीका केली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई झाली आहे. ही धुलाई टीम इंडियाच्या अंतिम ओव्हरमध्ये झाली आहे. पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका टीम इंडिया जिंकली.

काल आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इतकी भयानक गोलंदाजी केली त्याचा डाव 106 धावांवरती आटोपला. अर्शदीप सिंह, दीपक चाहर या दोघांच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांचं काहीचं चाललं नाही.

अर्शदीप सिंहने पहिल्या ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या, तसेच दीपक चाहर एका बाजून भेदक गोलंदाजी सुरु ठेवली.

हे सुद्धा वाचा

पुढील महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये या दोन गोलंदाजांनी संधी द्यावी लागेल, यासाठी सीनियर्सचा ताण वाढवला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें