AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उडवणार लग्नाचा बार, गर्लफ्रेंडनेच रिंग दाखवत जाहीर करुन टाकलं

Arshdeep singh engagement: टीम इंडियाचा वेगवाग गोलंदाज अर्शदीप सिंग याने त्याची गर्लफ्रेंड समीरनसोबत साखरपुडा केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडने स्वतः काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उडवणार लग्नाचा बार, गर्लफ्रेंडनेच रिंग दाखवत जाहीर करुन टाकलं
Arshdeep singh engagementImage Credit source: social media
| Updated on: Nov 11, 2026 | 5:58 PM
Share

भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंहने अभिनेत्री आणि मॉडेल समरीन कौरसोबत साखरपुडा केला आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी दोघांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. अर्शदीपने गुडघ्यावर बसून समरीनला प्रपोज केल्याचे फोटोही समोर आले आहेत. गर्लफ्रेंडने फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी पुढे आणली आहे. काय आहे पोस्टमध्ये जाणून घेऊ.

भारताचा वेगवान पेसर अर्शदीप सिंग याने साखरपुडा उरकला आहे. त्याची प्रेयसी समरीन कौर हिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे. कालच अर्शदीप आयपीएल ट्रेड डीलमध्ये पंजाब किंग्समधून निघून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीच त्याच्यासाठी ही दुसरी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याची प्रेयसी समरीन हिच्यासोबत साखरपुडा पार पडल्याने चाहत्यांकडूनही दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अर्शदीपची गर्लफ्रेंड समरीन हिने इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये अर्शदीप तिला रिंग देऊन लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. यावेळी समरिनने अनेक फोटो पोस्ट करत समरीनने खास कॅप्शनही दिलं आहे, “आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी मिळू शकल्या असत्या, पण त्या सगळ्यांपेक्षा तू मला मिळालास, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. आता आयुष्यभर आपण एकमेकांसोबत राहायचं आहे.” असं लिहित पुढे तिने “आपल्या दोघांच्या आयुष्यभराच्या सोबतीसाठी” असे शब्दही लिहून त्यासमोर हर्टचा इमोजी जोडला आहे.

समरीनने त्याखाली ११ नोव्हेंबर, २०२६ ही तारीख लिहिली आहे. यासोबतच तिने ‘हाय फियांसी’ असेही लिहिले आहे, त्यामुळे अर्शदीप आणि समरीनचा साखरपुडा झाल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्यावर क्रिडा विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Samreen (@samreenkaur__)

अर्शदीप आणि समरीन एकमेकांना डेट करत होते

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीच समरीनच्या वाढदिवसानिमित्त अर्शदीपने तिला रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांच्या नात्याला उघडपणे दुजोरा दिला होता. त्यानंतर अर्शदीप आणि समरीन अनेकदा एकत्र दिसले होते. आता, त्या दोघांनी आपले आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा साखरपुडा झाला आहे.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान