
IND vs PAK, Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. सुपर-4 स्टेवर दोन्ही संघाची पुन्हा एकदा टक्कर होणार आहे. या स्पर्धेच्या फायनमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रमुख सामन्यात भारताचे प्लेईंग 11 अर्थात खेळणारे 11 खेळाडू कोण असतील ? आपल्या 11 खेळाडूंसोबत कॅप्टन सूर्यकुमार यादवही मैदानात पाकिस्ताविरुद्ध उतरेल का ? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांच्या निकालांवरून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, सुपर 4 सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यापेक्षा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना उद्या, म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.
सुपर-4 साठी टीम इंडियात 2 बदल
त्यामुळे आता असा प्रश्न आहे की, पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यासाठी टीम इंडिया कोणते दोन बदल करेल? या प्रश्नाचे उत्तर अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा असू शकतात. ओमानविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात दोन्ही खेळाडूंना संधी देण्यात आली होती, तर त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देण्यात आली होती. पण, पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यासाठी बुमराह आणि वरुण टीम इंडियामध्ये परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुमराह आणि वरुणचे होणार पुनरागमन ?
जर बुमराह आणि वरुण या दोघांना पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर ते अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची जागा घेतील. जर असे झाले तर भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळताना दिसेल, ज्या खेळाडूंसोबत तो ग्रुप स्टेजमध्ये खेळला होता.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सांभाळतील. सूर्यकुमार यादव फर्स्ट डाउन असेल, त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल अशी क्रमवारी असू शकते. भारतीय गोलंदाजी युनिटमध्ये स्पेशालिस्ट फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांचा समावेश असेल. जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाचा एकमेव प्रमुख असेल, त्याला अष्टपैलू पंड्या आणि दुबे यांची साथ मिळेल.
पाकिस्तानविरुद्ध अशी असेल प्लेईंग 11
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह