Mohsin Naqvi : मोहसीन नक्वीचा नीचपणा, टीम इंडियाच्या खेळाडूंशी दहशतवाद्यांसारखा वागला, VIDEO व्हायरल

आशिया कप 2025 च्या ट्रॉफीचा वाद अद्याप मिटलेला नाही. मात्र याच दरम्यान एशियन क्रिकेट काऊन्सिलचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून मोठा वाद पेटला आहे. काय आहे तो व्हिडीओ ?

Mohsin Naqvi : मोहसीन नक्वीचा नीचपणा, टीम इंडियाच्या खेळाडूंशी दहशतवाद्यांसारखा वागला, VIDEO व्हायरल
मोहसीन नक्वी
Image Credit source: PTI
Updated on: Oct 24, 2025 | 4:06 PM

Asia Cup Trophy Controversy : गेल्या महिन्यात दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मात्र तरीही अद्याप भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी काही मिळालेली नाही. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि एशियन क्रिकेट काऊन्सिल (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी ( Mohsin Naqvi) यांच्यातील वाद आता इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल (ICC) पर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ते तासभर तसेच ताटकळत उभे होते. त्यानंतर त्यांनी ती ट्रॉफी घेतली आणि ते थेट निघून गेले. या मुद्यावरून बराच गदारोळ झाला, पण नक्वींनी काही भारतीय संघाला ती ट्रॉफी दिली नाही. दरम्यान याच मोहसीन नक्वी यांचा आणखी एक नीचपणा समोर आला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काय आहे तो व्हिडीओ ?

सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने झालेल्या या व्हिडीओमध्ये मोहसनी नक्वी दिसत असून त्यांच्या शेजारी उभा असलेला एक इसम आशिया कप ट्रॉफीच्या घटनेचे अतिशय आक्षेपार्ह शब्दात वर्णन करताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर भारतीय संघाला ‘दहशतवाद्यांसारखे’ वागवल्याबद्दल ती ACC प्रमुखांचे कौतुकही करतो. विशेश म्हणजे त्याच्या बाजूला उभं राहून त्याचं बोलणं ऐकणारे PCB आणि ACC अध्यक्ष ोहसीन नक्वी हे संपूर्ण व्हिडीओदरम्यान हसताना दिसले. म्हणजेच तिथे जे सांगितलं जात होतं, त्याच्याशी ते समहत असल्याचं त्यातून दिसून आलं.

Mohsin Naqvi : ‘सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाला…’ ट्रॉफीचोर मोहसीन नक्वीचं उद्दाम उत्तर, सगळ्या मर्यादा केल्या पार
या व्हिडीओत नक्वी यांच्या शेजारी उभा असलेला माणूस म्हणाला,“ जेव्हा हे (नक्वी) मैदानावर होते आणि भारतीय टीम (त्यांच्याकडून) ट्रॉफी घेत नव्हती तेव्हा त्यांनी संयम दाखवा आणि ते तिथेच उभे राहिले. ते बाजूला गेल्यावर इतर कोणाकडून तरी ही ट्रॉफी स्वीकारू अशी टीम इंडियाची इच्छा होती, पण त्यांना माहीत नव्हतं की आपले ACC चेअरमन हे गृहमंत्री देखील आहेत. त्यानंतर मग मोहसीन नक्वी यांनी टीम इंडियाला दहशतवाद्यांसारखे वागवले. त्यांनी ट्रॉफी त्याच्या गाडीत ठेवली आणि ते ती घेऊन गेले. आता संपूर्ण भारत ट्रॉफीच्या मागे धावत आहे.” असं तो माणूस व्हिडीओत म्हणाला.

 

28 सप्टेंबरला काय घडलं ?

28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आशिया कप ट्रॉफीचा अंतिम सामना झाला, तेव्हा टीम इंडियाने पाकिस्तानवर पाच विकेट्सने विजय मिळवल्यानंतर. मात्र ट्रॉफी प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये 90 मिनिटांपेक्षा जास्त उशिर झाला, ज्यामुळे पाकिस्तानी संघ त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला तर भारतीय खेळाडू तिथेच मैदानात थांबले. भारतीय संघातील खेळाडूंनी प्रायोजकांकडून वैयक्तिक पुरस्कार स्वीकारले मात्र, त्यांनी नक्वींकडून फायनलची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे संतापलेले मोहसिन नक्वी यांनी ती ट्रॉफी घेतली आणि ते त्यांच्या हॉटेलमध्ये निघून गेले.

IND vs PAK Final, Mohsin Naqvi : निर्लज्जपणाची हद्द ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाले मोहसीन नक्वी, पाकचा रडीचा डाव, BCCI ने सुनावलं