IND vs PAK Final, Mohsin Naqvi : निर्लज्जपणाची हद्द ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाले मोहसीन नक्वी, पाकचा रडीचा डाव, BCCI ने सुनावलं
Mohsin Naqvi, Asia Cup 2025 Trophy Controversy : आशिया कपची फायनल मॅच जिंकल्यावर टीम इंडियाने पाकच्या मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर त्यांचा निर्लज्जपणा दिसून आला, नक्वींनी खरे रंग दाखवले आणि ते ट्रॉफी त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यांच्या या कृतीवर बीसीसीआय प्रचंड नाराज असून कठोर विरोध दर्शवला आहे.

Asia Cup 2025 Trophy Controversy : आशिया कप 2025 च्या काल झालेल्या फायनलमध्ये भारातने पाकिस्तानला पुन्हा हरवत विजयी धडाका कायम ठेवला आणि आशिया कपचे विजेतेपदही पटकावले. फायनल मॅच भारातने जिंकली तर ट्रॉफी देखील त्यांनाच मिळायाला हवी होती ना, पण दुर्दैवाने असं झालं नाही. एशियन क्रिकेट काऊन्सिल अर्थात ACCचे चीफ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी हे भारतीय खेळाडूंचे मेडल्स आणि आशिया कपची ट्रॉफी घेऊन त्यांच्या हॉटेलमध्ये निघून गेले. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक निवेदन प्रसिद्ध केल्यावर हा रडीचा डाव, भयानक प्रकार उघडकीस आला. भारतीय संघ त्यांच्याकडून (नकवी) ट्रॉफी स्वीकारू इच्छित नव्हता, याचा अर्थ असा नाही की त्यांनी ती त्यांच्या हॉटेलमध्ये परत घेऊन जावे असे निवेदनात म्हटले होते. त्यांची ही कृती खेळाच्या भावनेच्या विरोधात आहे, असेही नमूद करण्यात आले.
टीम इंडियाचा नकवींकडून ट्रॉफी घेण्यास नकार
आशिया कप फायनलच्या सादरीकरण समारंभात मोहसिन नकवी हे स्टेजवर उपस्थित होते, परंतु बीसीसीआयने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्याऐवजी बीसीसीआयने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयारी दर्शवली. नाराज नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी आणि टीम इंडियाची पदके घेतली आणि ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. एका रिपोर्टनुसार ते असं म्हणाले की, भारतीय संघाला ट्रॉफी देण्याची गरज नाही.
BCCI ने चांगलच ऐकवलं
बीसीसीआय आता ACC एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याआधीच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नक्वी यांना फटकारले आणि भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार का दिला हेही स्पष्ट केले. देवजीत सैकिया यांच्या सांगण्यानुसार, नकी ज्या देशाचे ACC अध्यक्ष आहेत त्यांच्याशी भारत युद्ध करत आहे. शिवाय, आपल्या देशाशी युद्ध करणाऱ्या देशाच्या प्रतिनिधीकडून आपण ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. म्हणूनच आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला असे त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
नकवी यांच्या त्या कृतीवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही ट्रॉफी घेण्यास नकार दिला, पण त्याचा अर्थ असा नव्हे की ते (नकवी) ती ट्रॉफी त्याच्या हॉटेलमध्ये घेऊन जातील. त्यांची ही वृत्ती असह्य आहे. त्यांनी लवकरात लवकर ट्रॉफी भारताला परत करावी. सध्या आम्ही फक्त एवढीच मागणी करत आहोत असे सैकिया म्हणाले.
BCCI कारवाईच्या मूडमध्ये
तसेच सैकिया यांनी, नकवी यांच्या नक्वी यांच्या वर्तनावर कारवाई करण्याची मागणी केली. बक्षीस वितरण समारंभात जे काही घडले त्याचा बीसीलीआय तीव्र निषेध करेल आणि योग्य कारवाईची मागणी करेल असे त्यांनी सांगितले.
