ऑस्ट्रेलियावर तब्बल 31 वर्षांनी स्वतःच्याच देशात फॉलोऑनची नामुष्की

सिडनी : चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादलाय. 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध स्वतःच्याच मैदानात फॉलोऑनमध्ये खेळत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे लवकर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया एकही विकेट न गमावता सहा धावांवर खेळत आहे. पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे. तब्बल 31 वर्षांनी एखाद्या संघाने ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच मैदानावर फॉलोऑन लादलाय. यापूर्वी 1988 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन […]

ऑस्ट्रेलियावर तब्बल 31 वर्षांनी स्वतःच्याच देशात फॉलोऑनची नामुष्की
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

सिडनी : चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादलाय. 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध स्वतःच्याच मैदानात फॉलोऑनमध्ये खेळत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे लवकर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया एकही विकेट न गमावता सहा धावांवर खेळत आहे. पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे.

तब्बल 31 वर्षांनी एखाद्या संघाने ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच मैदानावर फॉलोऑन लादलाय. यापूर्वी 1988 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादला होता. याशिवाय भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर 1986 साली झालेल्या सिडनी कसोटीत फॉलोऑन लादला होता. सिडनीत नव्या वर्षाच्या मुहूर्तावर खेळवण्यात आलेली ती कसोटी अनिर्णिती राहिली होती.

पावसामुळे चौथ्या दिवशीचा खेळ पाण्यात गेला. पहिल्या सत्रात तर एकही चेंडू टाकण्यापूर्वीच पावसाने खोळंबा घातला आणि नंतर लंचची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या सत्रात पहिल्या डावात सहा बाद 236 धावांपासून पुढे खेळण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने आणखी 64 धावा जोडत 300 पर्यंत मजल मारली. याच धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळला.

शमीने खेळ सुरु होताच पॅट कमिन्सला माघारी धाडलं आणि ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. यानंतर पीटर हँड्सकॉम्ब आणि मिशेल स्टार्क यांनी 21 धावांची भागीदारी केली. पण बुमराने हँड्सकॉम्बचा त्रिफळा उडवत त्याला माघारी धाडलं. या दोन गोलंदाजांनंतर कुलदीप यादव आला. त्याने नाथन लायनला खातंही न उघडू देता बाद केलं. कुलदीप 93 व्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपवू शकत होता, पण त्या षटकात हनुमा विहारीने जोश हेझलवूडचा झेल सोडला आणि त्याला जीवनदान दिलं.

हेझलवूडने स्टार्कसोबत मिळून 42 धावांची भागीदारी केली आणि संघाला 300 धावांपर्यंत मजल मारुन दिली. पण कुलदीपने जास्त वेळ न देता ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादण्यात भारताला यश मिळालं. चहापानापर्यंत एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाने सहा धावा केल्या. तिसऱ्या सत्रात पुन्हा एकदा पावसाने अडथळा आणला आणि यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स, तर बुमराला एक विकेट घेण्यात यश मिळालं.

कुलदीपच्या नावावर नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत पाच विकेट घेत कुलदीपने नवा विक्रम नावावर केलाय. पहिल्या डावात पाच विकेट घेऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. 99 धावा देत त्याने या पाच विकेट घेतल्या. यापूर्वी याच सिडनीच्या मैदानावर इंग्लंडचे माजी गोलंदाज जॉनी वॉर्डल यांनी 1955 साली खेळवण्यात आलेल्या सामन्यात 79 धावा देत पाच विकेट घेतल्या होत्या. याशिवाय कुलदीपने गेल्या सहा कसोटी सामन्यात दुसऱ्यांदा एकाच डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

भारताने आपला पहिला डाव 622 धावांवर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळल्यानंतर भारताने 322 धावांची आघाडी घेतली. आतापर्यंतची भारताची ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरील ही सर्वात जास्त आघाडी आहे. एकूण धावांच्या बाबतीत ही दुसरी सर्वात मोठी आघाडी आहे. यापूर्वी भारताने 1988 मध्ये ईडन गार्डन्सवर 400 धावांची आघाडी घेतली होती.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.