
ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या गोलंदाजाने T20 क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. हा गोलंदाज मैदानात असला की, प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना धडकी भरायची. परफेक्ट यॉर्कर ही त्याच्या गोलंदाजीची खासियत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी 65 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्याने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्कने वर्ष 2012 मध्ये T20 इंटरनॅशनलमध्ये डेब्यु केला होता. तो 13 वर्ष T20 इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. तो शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना जून 2024 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध T20 सीरीजसाठी टीमची घोषणा केली, त्याचवेळी मिचेल स्टार्कने T20 इंटरनॅशनलमधून रिटायरमेंटची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या निवृत्तीची आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती दिली आहे.
अचानक रिटायरमेंट का?
आता प्रश्न हा निर्माण होतो की, मिचेल स्टार्कने अचानक T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय का घेतला? त्याच्या या निर्णयामागे काय कारण आहे?. याचं उत्तर दोन मोठ्या फॉर्मेटशी संबंधित आहे. स्टार्कला आता वनडे आणि कसोटी फॉर्मेटवर लक्ष केंद्रीत करायचय असं म्हटलं जातय. म्हणूनच त्याने T20 इंटरनॅशनलमधून निृत्ती जाहीर केलीय. स्टार्क आता 35 वर्षांचा आहे. अजून दोन वर्षांनी 2027 साली वनडे वर्ल्ड कप आहे. त्यावरही स्टार्क याची नजर आहे.
किती विकेट्स त्याच्या नावावर?
स्टार्कने 2012 साली पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने T20 इंटरनॅशनलमध्ये डेब्यु केला होता. जून 2024 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळून T20 मधील त्याचं करिअर संपलं. या दरम्यान 65 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने 79 विकेट्स आपल्या नावावर केले.
Mitchell Starc has announced his retirement from international T20s: https://t.co/ftVAx6Oh4X pic.twitter.com/RdOmoWveSh
— cricket.com.au (@cricketcomau) September 2, 2025
इंटरनॅशनल करिअरमधील सर्वात मोठं यश काय?
T20 इंटरनॅशनलमध्ये मिचेल स्टार्क दुसरा सर्वात जास्त विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियासाठी स्टार्कपेक्षा T20 मध्ये जास्त विकेट एडम जंपाने घेतले आहेत. जंपाच्या नावावर 130 विकेट्स आहेत. स्टार्कच्या T20 इंटरनॅशनल करिअरमधील सर्वात मोठं यश म्हणजे 2021 साली ऑस्ट्रेलियाने जिंकलेला T20 वर्ल्ड कप. या फॉर्मेटमधील ऑस्ट्रेलियन टीमच ते मोठं यश आहे.