भारताची 'फुलराणी' विवाहबंधनात!

मुंबई: बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना आता बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. कश्यप ही जोडी देखील लग्न बंधनात अडकली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर कोर्ट मॅरेज झाल्यानंतर लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. 16 डिसेंबरला सकाळी धार्मिक पद्धतीने लग्न होणार आहे. तर याच दिवशी हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायनाने कश्यप सोबतचा …

, भारताची ‘फुलराणी’ विवाहबंधनात!

मुंबई: बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना आता बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. कश्यप ही जोडी देखील लग्न बंधनात अडकली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर कोर्ट मॅरेज झाल्यानंतर लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. 16 डिसेंबरला सकाळी धार्मिक पद्धतीने लग्न होणार आहे. तर याच दिवशी हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सायनाने कश्यप सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं आहे की, “बेस्ट मॅच ऑफ माय लाईफ….जस्ट मॅरेड, म्हणजेच माझ्या करीयरमधील हा सर्वात शानदार सामना आहे…. नुकतेच मी लग्न बंधनात अडकली आहे.

मागील एक वर्षापासून सायना आणि कश्यपच्या लव्ह स्टोरीवर चर्चा सुरु होत्या. मात्र यावर दोघांनी एकदाही खुलासा केला नाही. हैदराबादचे राहणारे दोन्ही बॅडमिंटनपटू एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र ते रिलेशनशिप लपवून ठेवण्यात यशस्वी झाले. दोघांनी कोर्ट मॅरेज झाल्यावर आपले रिलेशनशिप सर्वांसमोर सार्वजनिक केले.

सायनाच्या लग्नाची घोषणा होण्याच्या एक दिवसआधी 13 डिसेंबरला पेहलवान विनेश फोगाट आणि सोमवीर राठी या दोघांनी लग्न केले. आतापर्यंत बऱ्याच अशा जोड्या आहेत ज्यामध्ये पती-पत्नी दोन्ही खेळाडू आहेत. पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंह, पहलवान गीता फोगट-पवन फोगट, साक्षी मलिक-सत्यव्रत कादियान आणि आता सायना-परुपल्ली कश्यपचाही या यादीत समावेश झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *