छोटा पॅकेट बडा धमाका, इतके षटकार चोपले की झाला नवीन रेकॉर्ड, 22 वर्षाच्या फलंदाजाचे देशासाठी शतक वेगवान

Parvez Hussain, UAE : बांगलादेशाचा सलामीचा फलंदाज परवेज हुसेन इमॉनने संयुक्त अरब अमिरातविरोधात वेगवान शतक ठोकले. त्याने कमी वयात मोठी कामगिरी बजावली. तो छोटा पॅकेट बडा धमाका ठरला. या शतकामुळे युएईवर बांगलादेशाने 27 धावांसह विजय मिळवला.

छोटा पॅकेट बडा धमाका, इतके षटकार चोपले की झाला नवीन रेकॉर्ड, 22 वर्षाच्या फलंदाजाचे देशासाठी शतक वेगवान
बांगलादेश युएई सामना
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 18, 2025 | 11:36 AM

शारजाहमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि बांगलादेश यांच्यात टी20 सामना सुरू आहे. बांगलादेशाने युएईला 27 धावांनी मात दिली. या विजयाचा हिरो ठरलो तो 22 वर्षीय सलामीचा फलंदाज परवेज हुसेन इमॉन. त्याने युएई विरोधात आज कुछ तुफानी करते है, चा प्रत्यय दिला. त्याने वेगवान शतक ठोकले. त्याने केवळ 54 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 100 धावांचा डोंगर रचला. यासोबतच तो T20I सामन्यात 7 हून अधिक षटकार लगावणारा पहिला बांगालदेशी फलंदाज ठरला आहे. याशिवाय बांगलादेशाकडून सलामीला उतरलेल्या इतरही अनेक रेकॉर्ड केले.

इमॉन याने रचला इतिहास

संयुक्त अरब अमिरातविरोधात शतक ठोकून परवेज हुसेन इमॉन याने T20I मध्ये देशासाठी मोठी कामगिरी केली. शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी वर्ष 2016 मध्ये बांगलादेशाचा सलामीचा फलंदाज तमीम इकबाल याने शतक ठोकले होते. इमॉन याने षटकार, चौकारांचा पाऊस पाडत सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम नावावर केला. त्याने केवळ 54 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. तमीम इकबाल याने 63 चेंडूत शतक केले.

UAE च्या विरोधात 17 मे रोजी खेळण्यात आलेल्या T20I सामन्यात परवेज हुसेन याने 9 शानदार षटकार ठोकले. एका डावात बांगलादेशी फलंदाजाने केलेली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. तर पहिल्यांदाच बांगलादेशातील टॉप ऑर्डरमधील एखाद्या फलंदाजाने T20I सामन्यात 5 पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत.

बांगलादेशाने युएईचा केला पराभव

परवेज हुसेन इमॉन याच्या शानदार शतकाच्या मदतीने बांगलादेशाने 20 षटकात 7 गडी गमावत 191 धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला सूर गवसला नाही. युएईकडून मुहम्मद जवादुल्लाह याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. पण लक्ष्य गाठताना युएईची दमछाक झाली. हा संघ 20 षटकात सर्व गडी बाद 164 धावा काढता आल्या. युएईला या सामन्यात 27 धावांनी पराभव पत्करावा लागला.

युएईचा कर्णधार मोहम्मद वसीम याने सर्वाधिक 54 धावा केल्या. याशिवाय या संघातील आसिफ खान याने 42 धावांचे योगदान दिले. तर बांगलादेशाकडून हसन महमूद याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर तंजीम हसन शाकिब, मेहदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. तर तनवीर इस्लाम याने एक गडी बाद केला.