IND vs NZ : ही गोष्ट ना वैभव सूर्यवंशीच्या फायद्याची, ना टीमच्या, बॅटिंग कोच सितांशू कोटक जे आहे ते स्पष्ट बोलले

IND vs NZ : वैभव सूर्यवंशीची टीम इंडियातून खेळण्याची प्रतिक्षा वाढत चालली आहे. त्याच्याकडे टॅलेंट आहे. पण टीम इंडियात त्याच्यासाठी जागा निर्माण होत नाहीय. यावर वेगवेगळी मत मतांतर आहेत.

IND vs NZ : ही गोष्ट ना वैभव सूर्यवंशीच्या फायद्याची, ना टीमच्या, बॅटिंग कोच सितांशू कोटक जे आहे ते स्पष्ट बोलले
Vaibhav sooryavanshi
| Updated on: Oct 23, 2026 | 6:53 PM

टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीवरुन जे हाइप तयार झालय ते त्याच्यासाठी आणि टीमसाठी दोघांसाठी चांगलं नाहीय असं स्पष्ट मत टीम इंडियाचे फलंदाजी कोच सितांश कोटक यांनी व्यक्त केलं. पहिल्या टी20 मध्ये इशान किशनला दुखापत झाली. त्यामुळे शनिवारी सूर्यवंशी खेळण्याची शक्यता आहे. वैभवला संधी मिळणार म्हणून कोटक उत्साहात आहेत. पण वैभव सूर्यवंशीची जितकी चर्चा होतेय, त्याचा त्याला स्वत:ला आणि टीमच्या अन्य खेळाडूंना काहीही फायदा नाहीय असं कोटक म्हणाले. न्यूझीलंड विरुद्ध दुसर्‍या टी20 मॅच आधी फलंदाजी कोच सितांशु कोटक बोलले. “तो अजून वयाने लहान आहे. पण संघ व्यवस्थापन त्याची काळजी घेतं. मी निष्पक्षपणे पाहतोय. वैभव प्रत्येकाला आवडतो. सोशल मीडियावरही वैभव लोकप्रिय आहे. पण लोकांना तो आवडतो म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकत नाही. तो प्रतिभावान आहे. मला विश्वास आहे, त्याचं भविष्य उज्वल आहे. म्हणून जेव्हा कधी त्याला संधी मिळेल, टीममध्ये सेट होईल, तेव्हा त्याला बरच काही शिकायला मिळेल” असं सितांशु कोटक म्हणाले.

“सुरुवातीला चर्चा होती की, त्याला खेळवलच पाहिजे. मला खरचं असं वाटलं की, हे त्या खेळाडूसाठी सुद्धा चांगलं नाही. कारण तो आता 15-16 वर्षांचा आहे. प्रत्येकजण म्हणतोय की, तो खेळला पाहिजे, त्याला टीममध्ये घेत नाहीयत, वैगेरे, वैगेरे.. तो आता लहान आहे” असं सितांशू कोटक म्हणाले.

Loading...

तो हे सर्व शिकेल

“भारताने संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तीन टॉप फलंदाजांना प्राधान्य दिलं. तो आता समजूतदार झालाय. त्याला लक्षात आलय की संजू सॅमसन चांगला खेळतोय. अभिषेकही चांगला खेळतोय. त्यामुळे त्यांना टीममधून कसं बाहेर बसवलं जाऊ शकतं. मधल्या फळीतही फलंदाज आहेत. त्याला खेळायची इच्छा असेल. मी त्याच्या जागी असतो, तर माझी सुद्धा हीच इच्छा असती. पण म्हणून त्याने कुठे तक्रार केलेली नाही. तो निराश झालेला दिसला नाही. चेंडू जोरात मारण्याची कला एक वेगळी गोष्ट आहे. या लेव्हलवर तुम्ही जे शिकता ते पूर्णपणे वेगळं आहे. तो हे सर्व शिकेल. याचा त्याला फायदा होईल” असं सितांशू कोटक म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us