AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL 10 | चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने मिचेल मार्श संतापला, भर मैदानात अंपायरला शिवीगाळ, पाहा व्हिडीओ

शनिवारी 30 जानेवारीला पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान हा सर्व प्रकार घडला.

BBL 10 | चुकीच्या पद्धतीने  बाद दिल्याने मिचेल मार्श संतापला, भर मैदानात अंपायरला शिवीगाळ, पाहा व्हिडीओ
मिचेल मार्श
| Updated on: Jan 31, 2021 | 1:13 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलियात बीग बॅश लीग (Big Bash League 10) स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. अनेक सामने हे रंगतदार होत आहेत. स्पर्धेत रंगत आणण्यासाठी या मोसमात नवे 3 नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र या मोसमात पंचांच्या कामिगिरीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. अशातच या स्पर्धेत पंचाने खेळाडू बाद घोषित केल्याने ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडर फंलदाजाला राग अनावर झाला. यामुळे त्याने भर मैदानातच अंपायरला शिवीगाळ केली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (bbl 10 Angered by the wrong dismissal Mitchell Marsh use abusive language for umpire)

नक्की काय झालं?

शनिवारी 30 जानेवारीला पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) यांच्यात सामना खेळण्यात आला. पर्थचा संघ फलंदाजी करत होता. ऑलराऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) बॅटिंग करत होता. स्पीनर स्टीव ओ कीफ सामन्यातील 13 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील 5 व्या चेंडू लेग स्टंपच्या दिशेने गेला. मार्शने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. बॅटला चेंडूचा स्पर्शही झाला नाही. हा चेंडू विकेटकीपरने अचूक झेलला.

यावर कॅचसाठी अंपायरकडे जोरदार अपिल करण्यात आली. अंपायरने मार्शला तडक बाद घोषित केलं. अंपायरने मार्शला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केलं. यामुळे मार्शला राग अनावर झाला. मार्शने आपला संताप व्यक्त केला. बाद दिल्याने मार्श ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. यावेळेस त्याने भर मैदानात अंपायरला शिवीगाळ केली. हा सर्व प्रकाराचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. यामुळे मार्शवर कारवाई होणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

डीआरएस नसल्याने गैरसोय

अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये डीआरस (Umpire Decision Review System) प्रणाली असते. योग्य आणि अचूक निर्णय देण्यासाठी तसेच पंचाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी खेळाडूंना डीआरस घेता येतो. पण या बीग बॅश लीग स्पर्धेत ही डीआरएस प्रणाली नसल्याने गैरसोय होत आहे. तसेच वादही निर्माण होत आहेत. यामुळे या स्पर्धेच्या आयोजकांवर सडकून टीका करण्यात येत आहे.

सिडनीचा 9 विकेट्सने शानदार विजय

जॉश इंग्लिसच्या नाबाद 69 धावांच्या खेळीच्या जोरावर पर्थने 20 षटकांमध्ये 167 धावा केल्या. यामुळे सिडनीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान मिळाले. सिडनीच्या फलंदाजांनी पर्थच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जेम्स विन्सने नाबाद 98 धावांची विजयी खेळी केली. तर जॉश फिलिपेने 45 धावा केल्या. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर सिडनीने केवळ 1 विकेट्सच्या मोबदल्यात 17 ओव्हरमध्येच विजयी आव्हान पूर्ण केलं.

संबंधित बातम्या :

BBL 2020 | 2 पॉवर प्ले, बोनस पॉइंट्स, T20 मधील तीन नव्या नियमांनी रंगत

(bbl 10 Angered by the wrong dismissal Mitchell Marsh use abusive language for umpire)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.