Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा

| Updated on: May 09, 2021 | 11:29 PM

टीम इंडिया (Team India) या दौऱ्यात वनडे (Odi) आणि टी 20 मालिका (T20 series) खेळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुलीने याबाबतची माहिती दिली आहे.

Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा
TEAM INDIA TOUR SRI LANKA
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka 2021) जाणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली आहे. तसेच या दरम्यान गांगुलीने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाबाबतही प्रतिक्रिया दिली. (BCCI planning for India vs Sri Lanka odi and t20 series in sri lanka after wtc final and before england test series)

गांगुली काय म्हणाला?

“टीम इंडियाला जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्याच्या दृष्टीने विचार सुरु आहेत. या दौऱ्यात विराट सेना वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत 3 तर टी 20 मालिकेत 5 सामने खेळण्यात येणार आहेत. मात्र याबाबतचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. यामुळे खेळाडूंना त्रास होईल. टीम इंडियाचा हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 नंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी असणार आहे”, अशी माहिती गांगुलीने Sportstar सोबत बोलताना दिली.

…तर इंग्लंडहून परतावं लागणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच या दोन स्पर्धांदरम्यान मोजून 12 दिवसांचा अंतर आहे. त्यामुळे जरी या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी या कालावधीत हे सामने खेळवले जाऊ शकतात. कारण त्यानंतर 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान भारताला इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळायची आहे. असे झाल्यास टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपचा अंतिम सामना संपवून श्रीलंकेला रवाना व्हावं लागेल.

गांगुली आयपीएलबाबत काय म्हणाला?

कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला. यानंतर उर्वरित सामन्यांबाबत गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. “या पर्वातील उर्वरित सामने हे भारतात खेळवण्यात येणार नाहीत. खेळाडूंसाठी 14 दिवस क्वारंटाईन राहणं आव्हानात्मक असतं. त्यामुळे या उर्वरित सामन्यांचे आयोजन कधी आणि कुठल्या देशात केलं जाणार, हे सांगणं जरा धाडसाचं ठरेल”असंही गांगुलीने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान

Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया ‘इतके’ दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन

(BCCI planning for India vs Sri Lanka odi and t20 series in sri lanka after wtc final and before england test series)