5

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान

बीसीसीआयने (Bcci) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 4 मे ला आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान
ipl 2021 trophy
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 9:30 PM

नवी दिल्ली : कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करावा लागला. यानंतर उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) प्रतिक्रिया दिली आहे. या मोसमातील उर्वरित सामने हे भारतात होणार की नाही, याबाबतची माहिती गांगुनीने दिली आहे. तसेच हे सामने कधी आणि कुठे खेळवण्यात येतील याबाबतही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. (remaining matches of the 14th season of the IPL will not be played in India say bcci president sourav ganguly)

गांगुली काय म्हणाला?

“या पर्वातील उर्वरित सामने हे भारतात खेळवण्यात येणार नाहीत. खेळाडूंसाठी 14 दिवस क्वारंटाईन राहणं आव्हानात्मक असतं. त्यामुळे या उर्वरित सामन्यांचे आयोजन कधी आणि कुठल्या देशात केलं जाणार, हे सांगणं जरा धाडसाचं ठरेल”असंही गांगुलीने स्पष्ट केलं. गांगुली Sportstar सोबत बोलत होता. यावेळस त्याने याबाबतची माहिती दिली.

कोरोनामुळे डोकेदुखी

“वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्ध लढा देतोय. डिसेंबर 2020 पासून ते या मार्चपर्यंत आम्ही संघर्ष केला आहे. सर्वच या परिस्थितीतून जात आहेत. क्रिकेटपटू याला अपवाद नाहीत. 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईत करणं आव्हानात्मक होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वच बिघडलंय. अशा परिस्थितीत पुन्हा आयोजन करणं हे किती कठीण आहे, हे समजू शकता”, असंही गांगुलीने स्पष्ट केलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 4 मे रोजी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता.

आयपीएलच्या यजमानपदासाठी हे देश उत्सुक

दरम्यान गांगुलीच्या वक्तव्यामुळे उर्वरित सामने भारतात होणार नाही, हे स्पष्ट झालंय. मात्र या उर्वरित 31 सामन्यांच्या यजमानपदासाठी एकूण 4 देश इच्छुक आहेत. यामध्ये इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि यूएईचा समावेश आहे. यूएईमध्ये 13 व्या मोसमाचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं होतं.

…तर बीसीसीआयला आर्थिक फटका

कोरोनामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे बीसीसीआयला उर्वरित सामने खेळवता न आल्यास आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. बीसीसीआयला तब्बल 2 हजार 500 कोटींचा फटका सहन करावा लागेल.

संबंधित बातम्या :

PHOTO | सचिन, विराटनंतर रिषभ पंत कोरोना विरुद्धच्या लढ्यात मैदानात, ‘या’ संस्थेद्वारे करणार मदत

(remaining matches of the 14th season of the IPL will not be played in India say bcci president sourav ganguly)

Non Stop LIVE Update
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?