BCCI Meeting: बीसीसीआयच्या मिटींगमध्ये राडा होणार, गंभीर-आगरकरांची तोंड पडणार, तीन मुद्यांवर चर्चा रंगणार
BCCI Review Meeting Reason: बीसीसीआयची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जोरदार राडा होण्याची शक्यता आहे कारण भारतीय संघाची मागील टी-20 मालिकेतील कामगिरी ही अतिशय वाईट होती, आता या बैठकीत जे मुद्दे उपस्थित होतील यावरुन वाद रंगण्याची शक्यता नाकारु शकत नाही.

BCCI Review Meeting: बीसीसीआयची एका महत्त्वपूर्ण बैठक या आठवड्यात पार पडणार आहे. भारतीय संघाची मागील टी-२० मधील कामगिरीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मोठा राडा होणार अशी चिन्ह दिसत आहे कारण भारतीय संघाची टी-२० मधील कामगिरी ही अतिशय वाईट होती. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया हे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची गुरुवारी भेट घेणार आहेत. ‘
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये भारताचा झालेला पराभव हे या बैठकीचे मुख्य कारण आहे. या दौऱ्यांमध्ये काय चुकले याचे केवळ विश्लेषण करण्यापलीकडेही चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी न्यूझीलंड मालिका आणि २०२७ विश्वचषकासाठीच्या दीर्घकालीन योजनांवरही चर्चा केली जाईल. सेंटर ऑफ एक्सलन्सचे सध्याचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे कारण खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्यांवर तोडगा काढणे.
बोर्डाच्या सूत्रांनुसार, या बैठकीचे महत्त्व केवळ एका रिव्हयू मिटिंगपूरते नाही. संघ व्यवस्थापन आपल्या गरजा आणि कार्ययोजना थेट बोर्डासमोर सादर करेल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी संघ पूर्णपणे तंदुरस्त नसतो नेहमी फिटनेसच्या समस्यांचा सामना करावा लागतो यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल आणि यालर तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल.
न्यूझीलंड दौऱ्यावर विशेष चर्चा
या बैठकीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये पाच एकदिवसीय, पाच टी-२० आणि दोन महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यांचा समावेश आहे. हे दोन कसोटी सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला हे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. भारतीय संघ व्यवस्थापन सध्या पाच प्रमुख वेगवान गोलंदाजांना न्यूझीलंडला नेण्याची योजना आखत आहे. यामध्ये मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांचा समावेश असेल. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत प्रत्येक खेळाडूंच्या फिटनेसवरुनच त्यांची भूमिका निश्चित केली जाईल. आकाश दीप सध्या अनफिट आहे, तर श्रीलंकेतील सिराजच्या अलीकडील फॉर्ममुळे एक वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. श्रीलंकेत त्याच्या गोलंदाजीचा वेग ताशी १३० किमी पेक्षा कमी नोंदवला गेला, ही व्यवस्थापनेसाठी चिंतेची बाब आहे.