
Smriti Mandhana Father Health : महिला क्रिकेट संघाच्या व्हाईस कॅप्टन आणि स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे स्मृती हिच्या वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे स्मृती हिचं लग्न देखील पुढे ढकलण्यात आलं. आता स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी स्मृती हिच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसापासून सांगलीतील सर्वहित डॉक्टर महेश शहा यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डिस्चार्ज मिळाल्याने स्मृतीच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
सांगायचं झालं तर, 23 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना हिचं पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न होणार होतं. पण वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आलं. पलाश आणि स्मृती यांनी मिळून लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.. स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर पलाश याची देखील प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे संगली येथील एका रुग्णालयात त्याला देखील दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर पलाश याला IV ड्रिप लावण्यात आली आणि ECG देखील करण्यात आलं. पण सर्वकाही नॉर्मल असून फक्त तणाव अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता पलाश याला मुंबईत आणलं असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.. असं देखील पलाश याच्या आईने सांगितलं आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलाश – स्मृती यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.
यामध्ये एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे, स्मृतीने सोशल मीडियावरून पलाश याच्यासोबत असलेल्या सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यावर अद्याप स्मृती आणि पलाश यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे स्मृतीने पोस्ट का डिलिट केल्या आहेत… याचं कारण समोर आलेलं नाही.
स्मृती आणि पलाश यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2019 पासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. ज्या मैदानावर स्मृती हिने वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घेतली, त्याच मैदानावर पलाश याने स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केला. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न देखील होणार होतं… पण वडिलांच्या प्रकृतीमुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे.