AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेतेश्वर पुजारा एकेकाळी आईसमोर रडायचा, म्हणायचा ‘एवढ्या दबावात मला क्रिकेट खेळणं जमणार नाही!’, पण….

एक वेळ अशी होती की ज्यावेळी मला वाटाचयं, दबावात मी क्रिकेट खेळू शकणार नाही. अशावेळी मी अगदीच लहान असताना आईसमोर बसून खूप रडायचो. परंतु ध्यान-धारणेने आणि योगाने माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला, असं पुजारा म्हणाला. (Cheteshwar Pujara Yoga meditation To Stay Away From negative thoughts)

चेतेश्वर पुजारा एकेकाळी आईसमोर रडायचा, म्हणायचा 'एवढ्या दबावात मला क्रिकेट खेळणं जमणार नाही!', पण....
चेतेश्वर पुजारा
| Updated on: May 06, 2021 | 11:26 AM
Share

मुंबई : एकेकाळी मला दबावात क्रिकेट खेळणं जमणार नाही, असं म्हणत हमसून हमसून रडणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आज आपल्या बॅटिंगने भल्या भल्या बोलर्सची झोप उडवतो. पण हे काही एका दिवसांत मिळालेलं यश नाहीय किंबहुना त्याने अनेक दिवस यासाठी मेहनत घेतलीय. या सगळ्यात त्याला योगा आणि मेडिटेशनचा खूप फायदा झाला, असं त्याने मुलाखतीत बोलताना सांगितलं. योगा आणि मेडिटेशनने नकारात्मक विचार कसे दूर पळतात आणि मनात सकारात्मक विचार कसे पिंगा घालायला लागतात, हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं. (Cheteshwar Pujara Yoga meditation To Stay Away From negative thoughts)

काय म्हणाला चेतेश्वर पुजारा?

पुजाराने यूट्यूबवरील माइंट मॅटर्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सकारात्मक राहण्याची राज की बात उलगडून सांगितली. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय खेळताना कधी कधी दडपण येतं. यावेळी नकारात्मक विचार केला की नकारात्मकच घडायला लागतं. अशावेळी मी रोज ध्यान धारणा करायचो, योगा मेडिटेशन करायचो, ज्यामुळे माझ्या मनात सकारात्मक विचार टिकून राहायचे ज्यामुळे माझ्या कारकीर्दीत खूप मोठा बदल झाला”

एक वेळ अशी होती की ज्यावेळी मला वाटाचयं, दबावात मी क्रिकेट खेळू शकणार नाही. अशावेळी मी अगदीच लहान असताना आईसमोर बसून खूप रडायचो. परंतु ध्यान-धारणेने आणि योगाने माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला, असं पुजारा म्हणाला.

चेतेश्वर पुजाराच्या डोक्यावरचं आईचं छत्र फार लवकर हरपलं. तो केवळ 17 वर्षांचा असताना त्याची आई त्याला कायमचं सोडून देवाघरी निघून गेली. आताही अधून मधून आईच्या आठवणीने पुजारा भावूक झालेला पाहायला मिळतो.

टेस्ट क्रिकेटचा बॉस

पुजारा हा कसोटी क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू आहे. भारतीय क्रिकेटमधील राहुल द्रविडनंतरची वॉल म्हणून तो परिचित आहे. एकदा का त्याने खेळपट्टीवर पाय रोवला की तो तासनतास बॅटिंग करतो. बोलर कित्येक ओव्हर्स टाकून हैरान होतात, मात्र पुजारा एकेरी-दुहेरी धावा काढून तर कधी संयमाने चांगल्या बॉलचा आदर ठेवतो. अशा प्रकारे टेस्टमध्ये त्याच्या नावावर अनेक रेकॉर्डही आहेत.

(Cheteshwar Pujara Yoga meditation To Stay Away From negative thoughts)

हे ही वाचा :

आयपीएल स्थगितीच्या घोषणेनंतर शोएब म्हणतो, ‘मी पहिल्यांदाच BCCI ला सांगितलं होतं…’

आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?

कोरोनाबाधित बापासाठी चिमुकल्या लेकीचा खास मेसेज, मेसेज वाचून बापही गहिवरला, म्हणतो, ‘हे माझं संपूर्ण जग…!’

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.