आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?

आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?
रियान पराग ट्विटरवर ट्रोल...

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा नवोदित खेळाडू रियान परागने (Riyan Parag) आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर एक ट्विट केलं. ते ट्विट सध्या लोकांच्या निशाण्यावर आहे. (IPL 2021 RR Riyan Parag troll on social media)

Akshay Adhav

|

May 06, 2021 | 9:54 AM

मुंबई : क्रिकेटपटू आपल्या मनातील भावना आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विटरचा आधार घेतात. पण कधीकधी क्रिकेटपटू भावनेच्या भरात काहीतरी ट्विट करतात आणि त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा नवोदित खेळाडू रियान परागने (Riyan Parag) आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर एक ट्विट केलं. ते ट्विट सध्या लोकांच्या निशाण्यावर आहे. (IPL 2021 RR Riyan Parag troll on social Media)

रियान परागने नेमकं काय ट्विट केलं?

आयपीएल स्थगित होताच रियान परागने एक ट्विट केलं. ज्या ट्विटमध्ये रियान परागने लिहिलं, “खत्म, टाटा, बाय-बाय”….! आयपीएल स्थगित झाल्यानंतर भावनेच्या भरात रियानने हे ट्विट केलं खरं पण लोकांना त्याचं हे ट्विट आवडलं नाही.

ट्विटरवर रियान पराग ट्रोल

अगोदरच आयपीएल स्थगितीचं कमालीचं दु:ख भारतीय क्रिकेट फॅन्सना झालं होतं. त्या दुखावर रियान परागच्या ट्विटने मीठ चोळलं. साहजिक क्रिकेट फॅन्सनी आयपीएल स्पर्धा स्थगित झालीय रद्द नाही अशी आठवण रियान परागला करुन दिली.

नेटकऱ्यांनी अनेक मिम्स शेअर करत रियानवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. एका नेटकऱ्याने अनिल कपूरचा फोटो शेअर करत त्याच्याखाली बोलने दो बोलने दो… बेचारे को तकलीफ हुई हैं…’, असं रियानला चिमटा काढणारं मिम्स शेअर केलं. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रोफेशनल क्रिकेटरला असं ट्विट करणं शोभत असल्याचं म्हटलं आहे.

रियानला ट्रोल केलेले काही निवडक ट्विट :

आयपीएलचं 14 वं पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित

एप्रिलनंतर भारताता कोरोनाचे (Corona) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले. त्यात आयपीएलचं आयोजन भारतात करणं हे जोखमीचं समजलं जात होतं. अशा परिस्थिती आयपीएल भारतात खेळवणं हे धोकादायक ठरु शकतं, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. अखेर ज्याचीच भिती होती तेच झालं. एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला.

(IPL 2021 RR Riyan Parag troll on social Media)

हे ही वाचा :

आयपीएल सुरु झाल्यानंतर पुन्हा ‘पिवळं प्रेम’, चेन्नईची जर्सी परिधान केलेली ही महिला क्रिकेटपटू कोण?

बायो बबलला रामराम करत खेळाडूंचा ‘मोकळा श्वास’, विराट अनुष्काचे घरी परततानाचे फोटो व्हायरल

चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण, खास फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें