चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण, खास फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज!

चहलची पत्नी धनश्रीला आयपीएल स्थगित झालेली काही आवडलं नाहीय. तिने आयपीएल सुरु असतानाचा एक फोटो शेअर केलाय तसंच एक इमोशनल मेसेज लिहित आयपीएलची आठवण येत असल्याचं म्हटलंय. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Shaerd Picture Over Missing IPL 2021)

चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण, खास फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज!
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 7:16 AM

मुंबई : देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सुरु असलेला आयपीएल 2021 चा  (IPL 2021)  14 वा हंगाम स्थगित करण्यात आला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची घोषणा केली. या स्पर्धेत एकूण एकूण 29 सामने खेळले गेले. उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. आयपीएल स्थगितीच्या घोषणेनंतर आता भारतीय खेळाडूंनी आपापल्या घराची वाट धरली आहे. बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील घरी पोहोचलेत. मात्र धनश्रीला आयपीएल स्थगित झालेली काही आवडलं नाहीय. तिने आयपीएल सुरु असतानाचा एक फोटो शेअर केलाय तसंच एक इमोशनल मेसेज लिहित आयपीएलची आठवण येत असल्याचं म्हटलंय. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Shared Picture Over Missing IPL 2021)

धनश्रीला आयपीएलची आठवण

सुदैवाने बंगळुरुच्या कोणत्याही खेळाडूला स्पर्धेदरम्यान कोरोनाची लागण झाली नव्हती. म्हणूनच बंगळुरुच्या ताफ्यातल्या सगळ्या भारतीय खेळाडूंनी लगोलग आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. अशातच चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण येत आहे. धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक खास फोटो शेअर केला आहे.

धनश्रीसोबत या फोटोत बंगळुरुचे स्टार खेळाडू दिसून येत आहेत. बंगळुरुचे दोन तडाखेबंद फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डिव्हिलियर्स या फोटोत धनश्रीसोबत दिसून येत आहेत. हा फोटो जीममधला असून वर्कआऊट करताना हा फोटो धनश्रीने काढलाय. पहाटे पाच वाजताचा जिम क्लब… बायो बबल फॅमिली खूप मिस करेल, असं कॅप्शन धनश्रीने दिलं आहे.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीच्या अनेक व्हिडीओंना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

धनश्री वर्मा अनेक वेळा सोशल मीडियावर तिच्या डान्सचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओंना तुफान प्रतिसाद मिळतो. नुकताच तिने केलेला भांगडा डान्स करत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. धनश्रीने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबत ठेका धरला होता. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ‘More skills on the board ? You’ve aced it just like hitting a perfect six @shreyas41 ‘ असं कॅप्शन देत धनश्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. धनश्रीसोबत श्रेयसनंही एकदम परफेक्ट स्टेप्स केल्यानं चाहते थक्क झाले होते.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Shared Picture Over Missing IPL 2021)

हे ही वाचा :

‘गरजूंना मदत करणं आमचं कर्तव्य’, कोरोनाविरोधी लढ्यात पठाण बंधूंनी उचललं मोठं पाऊल!

Icc Test Ranking | Rishabh Pantची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय विकेटकीपर

PHOTO | नवे आहेत पण छावे आहेत ! आयपीएलच्या 14 व्या मोसमात युवा खेळाडूंसमोर दिग्गजांचं लोटांगण

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.