आयपीएल सुरु झाल्यानंतर पुन्हा ‘पिवळं प्रेम’, चेन्नईची जर्सी परिधान केलेली ही महिला क्रिकेटपटू कोण?

आयपीएल सुरु झाल्यानंतर पुन्हा 'पिवळं प्रेम', चेन्नईची जर्सी परिधान केलेली ही महिला क्रिकेटपटू कोण?
इंग्लंडची महिला क्रिकेटर केट क्रॉस

3 ऑक्टोबर 1991 रोजी जन्मलेली केट क्रॉस इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात खेळते. इंग्लंडच्या संघातली धडाडीची बोलर म्हणून ती प्रसिद्ध आहे. (Chennai Super Kings Gift England Women Cricketer Kate Cross)

Akshay Adhav

|

May 06, 2021 | 8:14 AM

मुंबई : एप्रिलनंतर भारताता कोरोनाचे (Corona) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले. त्यात आयपीएलचं (IPL 2021) आयोजन भारतात करणं हे जोखमीचं समजलं जात होतं. अशा परिस्थिती आयपीएल भारतात खेळवणं हे धोकादायक ठरु शकतं, अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. अखेर ज्याचीच भिती होती तेच झालं. एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला. असं असलं तरी खेळाडू, प्रेक्षक आयपीएलला मिस करत आहेत. इंग्लंडची महिली क्रिकेटर केट क्रॉस (Kate Cross) चेन्नईची पाठीराखी आहे. तिच्यासाठी चेन्नई संघाने खास गिफ्ट पाठवलंय. यावेळी कोरोनामुळे स्थगित झालेली स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यानंतर मी पुन्हा चेन्नईला सपोर्ट करेल, असं केटने म्हटलंय. (IPL 2021 Chennai Super Kings Gift England Women Cricketer Kate Cross)

चेन्नईच्या जर्सीत असलेली महिला क्रिकेटपटू कोण?

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉसने ट्विटरवर एक फोटो अपलोड केला ज्यामध्ये तिने चेन्नई सुपर किंग्जची जर्सी परिधान केली आहे. चेन्नई फ्रँचायझीने आपल्याला जर्सी दिली असल्याचं तिने ट्विटमध्ये सांगितलं आहे. केट क्रॉसने यापूर्वी आयपीएलमध्ये चेन्नई संघाला पाठिंबा दर्शविला होता. ती चेन्नईची डायहर्ट फॅन आहे.

केटला चेन्नईकडून खास भेटवस्तू

केट क्रॉसने तिच्या ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो अपलोड केले आहेत. त्यापैकी एकामध्ये तिने चेन्नई संघाची जर्सी परिधान केली आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये तिचं नाव असलेली जर्सी दिसत आहे. ही जर्सी पाठवल्याबद्दल तिने चेन्नई संघाचे खास आभारही मानले आहेत.

पुन्हा पिवळं प्रेम…!

कोरोनाची परिस्थिती ठीक झाल्यावर आणि आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यावर मी पुन्हा सीएसकेला पाठिंबा देईल, असंही केट क्रॉसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याचसोबत तिने ट्विटमध्ये व्हिस्टल फ्रॉम होम, यलो लव्ह, व्हिस्टल पोडू, नांद्री, असे हॅशटॅग वापरले आहेत.

कोण आहे केट क्रॉस?

3 ऑक्टोबर 1991 रोजी जन्मलेली केट क्रॉस इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात खेळते. इंग्लंडच्या संघातली धडाडीची बोलर म्हणून ती प्रसिद्ध आहे. उजव्या हाताने बोलिंग करताना मेडियम फास्ट पद्धतीने बॉल टाकून प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट घेण्यात ती तरबेज आहे. 2013 साली तिने इंग्लंडच्या महिला संघात पदार्पण केलंय.

(Chennai Super Kings Gift England Women Cricketer Kate Cross)

हे ही वाचा :

IPL 2021 | आयपीएलवरील स्थगिती ‘या’ तीन संघांच्या पथ्यावर

बायो बबलला रामराम करत खेळाडूंचा ‘मोकळा श्वास’, विराट अनुष्काचे घरी परततानाचे फोटो व्हायरल

चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण, खास फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें