बायो बबलला रामराम करत खेळाडूंचा ‘मोकळा श्वास’, विराट अनुष्काचे घरी परततानाचे फोटो व्हायरल

बायो बबलला रामराम करत खेळाडूंचा 'मोकळा श्वास', विराट अनुष्काचे घरी परततानाचे फोटो व्हायरल
Photo : Viral Bhayani/Instagram

विराट अनुष्का बुधवारी सुखरुपपणे घरी पोहोचले. विराट आणि अनुष्काचे घरी जातावेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Virat Kohli and Anushka Sharma returned home from the IPL Photos Viral)

Akshay Adhav

|

May 06, 2021 | 7:44 AM

मुंबई : आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर आता भारतीय खेळाडूंची पावलं आपापल्या घराकडे वळाली आहे. बंगळुरुच्या (RCB) संघात आयपीएल स्पर्धा सुरु असताना सुदैवाने कुणीही कोरोना पॉझिटिव्ह आलं नव्हतं. त्याचमुळे भारतीय खेळाडूंनी लगोलग घरचा रस्ता पकडत सुरक्षित आणि सुखरुपपणे घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बुधवारी बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) घरी परततानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत विराट-अनुष्काची घरी जाण्याची लगबग दिसून येत आहे. (Virat Kohli and Anushka Sharma returned home from the IPL Photos Viral)

विराट अनुष्का घरी पोहोचले

आयपीएल स्थगित झाल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा तसंच मुलगी वामिका यांनी आयपीएलच्या बायो-बबलला बाय बाय करत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. बुधवारी ते सुखरुपपणे घरीही पोहोचले. विराट आणि अनुष्काचे घरी जातावेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयपीएल 2021 चा मोसम बंगळुरुसाठी धुमधडाक्याचा!

आयपीएल 2021 हा 14 वा मोसम बंगळुरुसाठी अतिशय मस्त चालला होता. पहिल्या चारही मॅचेस जिंकत त्यांनी 14 व्या पर्वाची धुमधडाक्यात सुरुवात केली होती. नंतर त्यांना दोन मॅचेसमध्ये पराभूत व्हावं लागलं. आरसीबीने या मोसमात एकूण 7 मॅचेस खेळल्या. त्यापैकी आरसीबीने 5 मॅचेस जिंकल्या. चांगल्या फॉर्मात असलेली आरसीबीची टीम यंदाच्या आयपीएल मोसमात जेतेपद जिंकेल, असं बहुतेक जणांना वाटत होतं.

आयपीएलचं 14 वं पर्व कोरोनामुळे स्थगित

एप्रिलनंतर भारताता कोरोनाचे (Corona) मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले. त्यात आयपीएलचं आयोजन भारतात करणं हे जोखमीचं समजलं जात होतं. अशा परिस्थितीत आयपीएल भारतात खेळवणं हे धोकादायक ठरु शकतं, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. अखेर ज्याचीच भिती होती तेच झालं. एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला. 3 मे ला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यान्याआधी 2 खेळाडू बाधित सापडले. त्यामुळे हा सामना स्थगित करावा लागला. मात्र त्यानंतर आणखी खेळाडूंना कोरोनाने गाठलं. यामुळे सर्वच बाजूने  आयपीएल स्थगित करण्याची मागणी जोर धरु लागली. यामुळे नाईलाजस्तोर स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला.

(Virat Kohli and Anushka Sharma returned home from the IPL Photos Viral)

हे ही वाचा :

चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण, खास फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज!

PHOTO | नवे आहेत पण छावे आहेत ! आयपीएलच्या 14 व्या मोसमात युवा खेळाडूंसमोर दिग्गजांचं लोटांगण

IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादच्या हॉटेलमध्ये 3 संशयित, बीसीसीआयने केली ‘ही’ कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें