IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादच्या हॉटेलमध्ये 3 संशयित, बीसीसीआयने केली ‘ही’ कारवाई

बीसीसीआयच्या (Bcci) एसीयू प्रमुख (Acu) शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादच्या हॉटेलमध्ये 3 संशयित, बीसीसीआयने केली 'ही' कारवाई
बीसीसीआयच्या (Bcci) एसीयू प्रमुख (Acu) शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 9:49 PM

मुंबई | भारतासह जगभरात क्रिकेट (Cricket) सामन्यांचे आयोजन करण्यात येते. मॅच फिक्सिंग सारखा कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी (icc) आयसीसी आणि संबंधित क्रिकेट बोर्ड आपल्या परीने प्रयत्न करतात. आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत मॅच फिक्सिंगसारखे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयपीएल (ipl 2021) सारख्या लोकप्रिय स्पर्धेतही मॅच फिक्सिंग होण्याची शक्यता असते. असा प्रकार होऊ नये यासाठी (Bcci) बीसीसीआयच्या लाचलुचपत विभागाचे अधिकारी खेळाडूंसोबत चर्चा करतात. तसेच हे अधिकारी संशयितावर कारवाई करतात. कोरोनानंतर आयपीएल स्पर्धेवर फिक्सिंगचे सावट आले आहे. (ipl 2021 mumbai police have arrested 3 people who live in sunrisers hyderabad team hotel in mumbai)

बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शब्बीर हुसैन शेखदम खंडवावाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दोघांना बनावट ओळखपत्रामुळे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या चौकशीनंतर ते सट्टेबाज असल्याचे उघड झाले. तर या मैदानात क्लिनर म्हणून कार्यरत असलेला एक जण फरार आहे.

सामन्यादरम्यान मुंबईतही 2 सट्टेबाज

दिल्लीसह मुंबईतील सामन्यादरम्यान हे सट्टेबाज लक्ष ठेवून होते. पण मुंबईत बीसीसीआयचं भ्रष्टाचार विरोधी पथक जागृत होते. त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडला नाही. सनरायजर्स हैदराबादच्या काही सामन्यांचे आयोजन हे मुंबईत करण्यात आले होते.

त्यावेळेस हैदराबादचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये 3 संशियत सापडले. मात्र त्यांचा खेळाडूंशी संपर्क होऊ शकला नाही. खंडवावाला यांनी याबाबतची माहिती दिली. “आम्हाला या प्रकाराची माहिती होताच आम्ही मुंबई पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. पोलिसांना तडक या तिघांना अटक केली.”, असं खंडवावाला म्हणाले.

ग्राऊंड स्टाफकडून बुकींना माहिती

अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात मैदानातील सफाई कर्मचाऱ्याने पीच साइडिंगद्वारे सट्टेबाजांना मदत केल्याची शक्यता खंडवावाला यांनी व्यक्त केली. मैदानातून आणि टीव्हीवरुन सामना पाहणे यात काही सेंकंदाचा अंतर असतो. याचा फायदा घेत सट्टेबाजांना क्षणोक्षणाची माहिती देणं म्हणजे पिच साइडिंग होय.

दिल्ली पोलिसांकडून दोघांना अटक

गुजरातमधील माजी पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांनी माहिती दिली की, “ACU च्या अधिकाऱ्याने या प्रकरणी एकाला धरलं. त्याची चौकशी केली. मात्र यावेळेस त्या संशयिताने 2 मोबाईल सोडून पळ काढला. याबाबत अधिकाऱ्याने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी ACU अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आणखी एका प्रकरणातून कोटलामधून 2 जणांना अटक केली. त्यासाठी आम्ही दिल्ली पोलिसांचे आभारी आहोत.”

राजस्थान विरुद्ध हैदराबाद यांच्यात 2 मे ला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बनावट ओळखपत्राद्वारे दोघांनी मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयशी ठरले. सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली.

संबंधित बातम्या :

PHOTO | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, खेळाडूंचं आर्थिक नुकसान, ‘या’ क्रिकेटपटूंचे अखेरचं पर्व ठरणार?

PHOTO | आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करणारे खेळाडू

(ipl 2021 mumbai police have arrested 3 people who live in sunrisers hyderabad team hotel in mumbai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.