ENG vs IND : आता टेस्ट सीरीज संपल्यानंतर इंग्लंडच्या एका प्लेयरने ऋषभ पंतची मागितली माफी, एक मेसेजने विरघळला

ENG vs IND : भारत आणि इंग्लंड टेस्ट सीरीज दरम्यान ऋषभ पंत आणि ख्रिस वोक्स दोघांना दुखापत झाली. दोघेही दुखापतीनंतर मैदानात आपल्या टीमसाठी खेळण्यास उतरले. आता दोघांबद्दल एक इमोशनल बातमी समोर आलीय.

ENG vs IND : आता टेस्ट सीरीज संपल्यानंतर इंग्लंडच्या एका प्लेयरने ऋषभ पंतची मागितली माफी, एक मेसेजने विरघळला
rishabh pant
Image Credit source: PTI
Updated on: Aug 07, 2025 | 2:07 PM

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी संपली. या टेस्ट सीरीज दरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि इंग्लंडचा ऑलराऊंडर ख्रिस वोक्सला दुखापत झाली. ऋषभ पंतला चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. वोक्सला पाचव्या कसोटी दरम्यान फिल्डिंग करताना खांद्याला दुखापत झाली. टेस्ट सीरीज संपल्यानंतर इंग्लिश प्लेयरने ऋषभ पंत बद्दल मोठा खुलासा केला आहे. टेस्ट सीरीज संपल्यानंतर मी ऋषभ पंतची माफी मागितली असा खुलासा वोक्सने केलाय.

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. वोक्सचा एक चेंडू ऋषभ योग्य पद्धतीने खेळू शकला नाही. चेंडू थेट त्याच्या पायाला लागलेला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलेलं. दुखापत मोठी होती. मात्र, तरीही ऋषभ पंत संघाला गरज असल्यामुळे दुसऱ्यादिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने टीमसाठी अर्धशतकी खेळी केली. पाचव्या टेस्ट दरम्यान वोक्सच्या खांद्याला दुखापत झाली. मात्र, तरीही एकाहाताने फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्या बद्दल त्याचं भरपूर कौतुक झालं.

मला खरच वाईट वाटतय

द गार्डियनशी बोलताना ख्रिस वोक्स म्हणाला की, मी पाहिलं की, ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर एक सेल्यूट इमोजी बनवून माझा फोटो लावलाय. म्हणून मी त्याला थँक्स म्हणालो. त्यानंतर त्याने मला वॉइस नोट पाठवली. त्याने त्याने म्हटलेलं की, “मला अपेक्षा आहे की, सर्व ठिक असेल. रिकव्हरीसाठी सुद्धा त्याने शुभेच्छा दिल्या” “मला अपेक्षा आहे की, कधी ना कधी आम्ही पुन्हा भेटू. त्याचा पाय मोडला त्या बद्दल मी त्याची माफी सुद्धा मागितली. मला खरच वाईट वाटतय” असं ख्रिस वोक्स म्हणाला.

इंग्लंड आणि भारतातली टेस्ट सीरीज बरोबरीत संपली. पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला, दुसरा भारताने. तिसरा इंग्लंडने चौथा ड्रॉ आणि पाचवा शेवटचा कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला.