AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल

भारतासाठी आजचा दिवस खास ठरला आहे. अनेक पदकं ही भारताच्या पारड्यात पडली आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साह साजरा केला जात आहे.

CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स-2022 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल
| Updated on: Jul 30, 2022 | 10:47 PM
Share

राष्ट्रकूल स्पर्धेत (birmingham commonwealth games 2022) मीराबाई चानूला (Meerabai Chanu) गोल्ड मिळालं (Gold Medal) आहे. तिच्या रुपाने भारताला या स्पेर्धेत मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे. मीराबाई चानूला टोकियो ऑलिपिंकमध्ये सिल्व्हर मेडल मिळालेले आहे. 49 वयोगटाच्या श्रेणीत तिला गोल्ड मिळेल अशी आशा होती. तिने ती सार्थ करुन दाखवली आहे. दुसऱ्या प्रयत्नात तिने 88 किलो वजन उचलून तिचा स्वताचा नवा रेकॉर्ड तयार केला. वेटलिफ्टिंगमध्ये आत्तापर्यंत भारताला दोन मेडल्सची कमाई झालेली आहे. स्टार वेटलिफ्टर असलेल्या मीराबाईने पहिल्यचा प्रयत्नात 84 किलो वजन उचलले, तर दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलून तिने स्वताचाच रेकॉर्ड तो़डला आहे. तिसऱ्या प्रयत्नात तिने 90 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यात ती सफल होऊ शकलेली नाही. मॉरीशसची रनाइवोसोवा 76 किलो उचलून दुसऱ्या स्थानी राहिली. तर नायजेरियाची स्टेला किंग्सी 75 किलो वजवन उचलून तिसऱ्या स्थानी आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

आजची कामगिरी कशी राहिली?

भारताच्या मीराबाई चानूने क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात 109 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक निश्चित केले. मीराबाई चानूने दुसऱ्या प्रयत्नात113 किलो वजन उचलले. यासह त्याने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रम केला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात तिला 115 किलो वजन उचलण्यात यश आले नाही. मात्र तिचे पदक निश्चित झाले.

मीराबाईची मागील काही दिवसातली कामगिरी

  1. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.
  2. कर्णम मल्लेश्वरीनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी दुसरी भारतीय वेटलिफ्टर
  3.  2020 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले
  4. 2018 गोल्ड कोस्ट सुवर्णपदक जिंकले
  5. 2017 च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक
  6.  ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक
  7.  2022 कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकले

रौप्य आणि कांस्य कुणाला?

मिरिसाच्या मेरी रुनिवोसोवाने 172 किलो वजनासह रौप्य आणि कॅनडाच्या हाना कामिन्स्कीने 171 किलो वजनासह कांस्यपदक जिंकले. बर्मिंगहॅम गेम्समध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत, जी केवळ वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. तत्पूर्वी संकेत महादेव सरगरने रौप्य आणि गुरुराजा पुजारीने कांस्यपदक जिंकले. तर आता मीराबाईच्या रुपाने पहिलं गोल्ड मेडल मिळालं असल्याने भारताची घौडदौड आणखी चांगली होणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.