AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022 Medal Tally: भारताच्या खात्यात 4 नवीन मेडल्स, जाणून घ्या रँकिंगमध्ये कुठल्या स्थानी?

CWG 2022 Medal Tally: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एका टप्पा पूर्ण झाला आहे. राष्ट्रकुलचे पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मेडल्ससाठीची स्पर्धा वेग पकडतेय. पदकतालिकेत तिसऱ्या स्थानापासून ही शर्यत सुरु होतेय.

CWG 2022 Medal Tally: भारताच्या खात्यात 4 नवीन मेडल्स, जाणून घ्या रँकिंगमध्ये कुठल्या स्थानी?
india lawn ball teamImage Credit source: PTI
| Updated on: Aug 03, 2022 | 12:07 PM
Share

मुंबई: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एका टप्पा पूर्ण झाला आहे. राष्ट्रकुलचे पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मेडल्ससाठीची स्पर्धा वेग पकडतेय. पदकतालिकेत तिसऱ्या स्थानापासून ही शर्यत सुरु होतेय. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाकडे विशाल आघाडी असून त्यांचा दबदबा कायम आहे. यजमान इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. काल गेम्सचा पाचवा दिवस भारतासाठी चांगला ठरला. भारताने 2 गोल्डसह 4 मेडल्स जिंकले.

भारताने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवलं

मंगळवारी 2 ऑगस्टला भारताची कामगिरी आधीच्या दिवसांच्या तुलनेत चांगली ठरली. भारताकडून महिला संघाने लॉन बॉलच्या टीम इवेंट मध्ये ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर पुरुष संघाने टेबल टेनिस मध्ये सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवलं. भारताकडून विकास ठाकूरने वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनच्या मिक्सड टीम इवेंट मध्ये भारताने रौप्यपदक विजेती कामगिरी केली.

पदकांची संख्या वाढली पण रँकिंग मध्ये बदल नाही

मंगळवारच्या प्रदर्शनानंतर पदकांची संख्या 9 वरुन 13 झाली. पण त्याने पदकतालिकेतील स्थानावर फरक पडला नाही. भारतीय टीम 5 गोल्ड सह एकूण 13 पदकं मिळवून सहाव्या स्थानावर आहे. फक्त भारतच नाही, पदकतालिकेत पहिल्या सहा स्थानांमध्येही कुठला बदल झाला नाही.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मध्ये लढत

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या स्थानावर जलवा कायम आहे. त्यांच्याकडे मोठी आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने 42 गोल्डसह एकूण 106 मेडल्स जिंकली आहेत. नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियासाठी स्विमर्सनी पदक जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी स्विमिंग मध्ये 6 गोल्डसह एकूण 17 पदकं जिंकली आहेत. यजमान इंग्लंडने वेगवेगळ्या खेळांमध्ये मेडल्स मिळवली आहेत. ते दुसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत 29 देशांनी मेडल्स जिंकली आहेत. 128 गोल्डसह 391 मेडल्स एथलीट्सनी मिळवली आहेत.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.