CWG 2022: एका इंजेक्शन मुळे भारतीय गोटात उडाली होती खळबळ, मागच्या कॉमनवेल्थ मध्ये झाला होता मोठा वाद

कॉमनवेल्थ गेम्स 2022 चं (commonwealth games 2022)काउंट डाउन सुरु झालं आहे. गेम्सच आयोजन बर्मिंघम मध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

CWG 2022: एका इंजेक्शन मुळे भारतीय गोटात उडाली होती खळबळ, मागच्या कॉमनवेल्थ मध्ये झाला होता मोठा वाद
NeedleImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:12 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चं (commonwealth games 2022)काउंट डाउन सुरु झालं आहे. गेम्सच आयोजन बर्मिंघम मध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यासाठी भारतीय पथक पूर्णपणे तयार आहे. खेळाडूंसोबत स्टाफनेही मेहनत घेतली आहे. मागच्या कॉमनवेल्थ मध्ये ज्या चुका झाल्या होत्या, त्या टाळण्याचा भारतीय पथकाच्या स्टाफचा प्रयत्न असेल. 2018 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एका इंजेक्शन वादामुळे भारतीय गोटात खळबळ उडाली होती. प्रकरण खूप पुढ पर्यंत गेलं होतं. भारतीय बॉक्सिंग टीम एका सीरिंज वादामध्ये अडकली होती. कॉमनवेल्थ खेळ महासंघाच्या सीजीएफ न्यायालयाने या सीरिंज वादात डॉक्टर अमोल पाटील यांना फटकारलं होतं. पाटील यांच्यावर नो नीडल पॉलिसीचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. थकलेल्या खेळाडूंना विटामीन बी कॉम्प्लेक्स इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं होतं.

भारतीय पथकासोबत जास्त डॉक्टर नव्हते

नो नीडल पॉलिसी अंतर्गत सीरिंज एका निर्धारित ठिकाणावर ठेवावी लागते. फक्त सीजीएचे अधिकृत मेडिकल कर्मचारीच तिथपर्यंत पोहोचू शकतात. सीरिंज मिळाल्यानंतर डोप टेस्ट करण्यात आली होती. जी निगेटिव्ह आली होती. भारतीय डॉक्टरला सीरिंज खोली मध्ये ठेवायची होती. मागच्या कॉमनवेल्थ मध्ये भारतीय पथकासोबत जास्त डॉक्टर नव्हते. 327 सदस्यीय भारतीय पथकासोबत फक्त एक डॉक्टर आणि फिजियो होता.

नो नीडल पॉलिसी

नो नीडल पॉलिसी अंतर्गत दुखापत, आजारी असतानाच सीरिंजचा वापर करता येतो. पण ती सीरिंज वापरण्याआधी मंजुरी घ्यावी लागते. फक्त खेळाडूच नाही, स्टाफलाही सीरिंज वापरण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सीरिंज वापरल्यानंतर ती एक खास जागी फेकावी लागते. तसा नियम आहे. गेम्स दरम्यान खेळाडूला इंजेक्शन घ्यावं लागलं, तर त्याला आधी एक फॉर्म भरावा लागतो. नियम तोडल्यास, कारवाई होते, अनेक टेस्टही कराव्या लागतात.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.