CWG 2022: एकाच दिवसात भारताकडून 6 पराभव झाल्यामुळे पाकिस्तानात हाहाकार, खेळाडू भडकले सरकारवर

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी अजून म्हणावी तशी सुरुवातही केलेली नाही. पण आतापासूनच पाकिस्तान मध्ये हाहाकार निर्माण झालाय.

CWG 2022: एकाच दिवसात भारताकडून 6 पराभव झाल्यामुळे पाकिस्तानात हाहाकार, खेळाडू भडकले सरकारवर
cwg 2022
Image Credit source: twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 30, 2022 | 11:26 AM

नवी दिल्ली:  कॉमनवेल्थ गेम्स मध्ये (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी अजून म्हणावी तशी सुरुवातही केलेली नाही. पण आतापासूनच पाकिस्तान मध्ये हाहाकार निर्माण झालाय. कारण पहिल्यादिवशी पाकिस्तानला दोन क्रीडा प्रकारात 6 वेळा भारतीय खेळाडूंकडून पराभवाचा सामना करावा लागला. 29 जुलैला भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू बॉक्सिंग आणि बॅडमिंटनच्या खेळात आमने-सामने आले होते. यात एक बॉक्सिंगची मॅच झाली. 5 बॅडमिंटनचे सामने झाले. भारतीय खेळाडूंनी सर्व सामने जिंकत, पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तान विरुद्ध भारतीय खेळाडूंनी विजयाची सुरुवात बॉक्सिंग रिंगपासून केली. पहिल्यादिवशी पाकिस्तान विरुद्ध शेवटचा विजय बॅडमिंटनच्या महिला दुहेरी प्रकारात मिळवला. पाकिस्तानला हरवण्याचा खेळ भारतीय बॉक्सर शिव थापाने सुरु केला, तर शेवट पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या गायत्रीने त्रिशाच्या साथीने केला.

शिव थापाच्या पंचच पाकिस्तान बॉक्सरकडे कुठलही उत्तर नव्हतं

आशियाई चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या शिव थापाने 63 किलो वजनी गटात पाकिस्ताच्या बलोच सुलेमानचा पराभव केला. शिव थापाने पाकिस्तानी बॉक्सरला सरेंडर करायला भाग पाडलं. त्याने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. त्याने राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे.

बॅडमिंटनच्या पाच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला

भारताने पाकिस्तानवरील विजयाचा हा सिलसिला बॅडमिंटन मध्येही कायम ठेवला. भारताने पाकिस्तानला क्लीन स्वीप केलं. टीम इवेंटच्या सर्व 5 ही सामन्यात पराभव झाला. मिश्र दुहेरीत सुमित आणि अश्विनी जोडी जिंकली. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतने विजय मिळवला. महिला सिंगल्स मध्ये पीव्ही सिंधुने सहज विजय मिळवला. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग जोडीने विजय मिळवला.

खेळाडूंचा सरकारवर रोष

पहिल्याचदिवशी भारताकडून इतके सारे पराभव झाल्यामुळे पाकिस्तानात हाहाकर उडणं स्वभाविक होतं. खेळाडूंनी सरकारवर राग काढला. पीव्ही सिंधुचा सामना करणारी पाकिस्तानी बॅडमिंटनपटू मुहर शहजार एका मुलाखतीत म्हणाली की, “पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अकादमी नाहीय. भारतात अशा 10 ते 11 अकादमी आहेत. पाकिस्तानात क्रिकेट सोडून दुसऱ्या कुठल्याही खेळावर इतके लक्ष दिले जात नाही. भारतात बॅडमिंटनवर भर दिला जातो. पाकिस्तानात आम्हाला अशा सुविधा मिळाल्या तर कामगिरीत सुधारणा होईल”

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें