IND vs WI : इशान किशनची कॅच पकडणारा मैदानात डोकं पकडून बसला, रिप्लेमध्ये सरळ सरळत दिसत होतं पण..VIDEO भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राडा

IND vs WI : श्रेयस अय्यरच्या कॅप्टन इनिंगच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी 20 सामना 8 विकेटने जिंकला. या मॅचमध्ये ईशान किशनच्या एका कॅचवरुन राडा पहायला मिळाला. भारतीय टीमला विजयासाठी 172 धावांचं टार्गेट मिळालं होतं.

IND vs WI : इशान किशनची कॅच पकडणारा मैदानात डोकं पकडून बसला, रिप्लेमध्ये सरळ सरळत दिसत होतं पण..VIDEO भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राडा
ishan kishan
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 07, 2026 | 9:55 AM

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मंगळवारी भारत-वेस्ट इंडिज मध्ये पहिला टी20 सामना झाला. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन इनिंगच्या बळावर टीम इंडियाने ही मॅच 8 विकेटने जिंकली. भारतीय टीमला विजयासाठी 172 धावांचं टार्गेट मिळालं होतं. भारताने 14.4 ओव्हरमध्येच हे लक्ष्य पार करुन विजय मिळवला. भारताने टी 20 सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रेयसने या मॅचमध्ये 10 फोर आणि 6 सिक्स ठोकत 43 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. लखनऊच्या टी20 मॅचमध्ये ईशान किशनच्या कॅचवरुन मोठा वाद होतोय. वेस्ट इंडिजला त्यांच्यासाठी महत्वाचा असलेला ईशान किशनच विकेट मिळाला होता. पण थर्ड अंपायरच्या निर्णयाने सगळा खेळ पालटला. कॅच पकडणारा मॅथ्यू फोर्डसह कॅरिबियाई प्लेयर्स या निर्णयामुळे निराश झाले.

धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने वेगवान सुरुवात केली. अभिषेक शर्माने 10 चेंडूत 21 धावा केल्या. संजू सॅमसन 11 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर ईशान किशनने श्रेयस अय्यरसोबत मिळून डाव सावरला. 11 व्या ओव्हरमध्ये शमर स्प्रिंगरच्या पाचव्या चेंडूवर ईशान किशनने ऑफ स्टम्प बाहेर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन डीप कवरच्या दिशेने गेला. मॅथ्यू फोर्ड वेगाने पळाला. डाइव मारुन त्याने जमिनी लगत कॅच पकडली.

Loading...

डोकं पकडून तो मैदानावरच बसला

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना वाटलं की, ईशान किशन आऊट झालाय. मैदानी अंपायर्सना डाऊट असल्याने त्यांनी कॅचबद्दल थर्ड अंपायर रोहित पंडित यांचा कौल मागितला. रिप्लेमध्ये फोर्डची बोटं चेंडूच्या खाली दिसत होती. त्याचवेळी चेंडू पकडताना हात आणि जमिनीमध्ये किंचित अंतरही दिसत होतं. अनेक अँगल तपासल्यानंतर थर्ड अंपायरने चेंडूने जमिनीला स्पर्श केल्याचा निष्कर्ष रोहित पंडित यांनी काढला. त्यांनी ईशान किशनला नॉटआऊट ठरवलं. या निर्णयामुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू निराश झाले. फोर्डला धक्का बसला. डोकं पकडून तो मैदानावरच बसला. वेस्ट इंडिजचे अन्य खेळाडू सुद्धा या निर्णयामुळे हैराण दिसले. कोच डॅरन सॅमीना सुद्धा थर्ड अंपायरचा निर्णय पटला नाही.

सामना त्यांच्या हातातून निसटला

या वादानंतर मॅथ्यू फोर्डला कमबॅक नाही करता आलं. त्याच्या 14 व्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यर आणि ईशान किशन दोघांनी 24 धावा लुटल्या. त्यानंतर काही वेळाने वेस्ट इंडिजला एक संधी मिळाली. पण शमर जोसेफने श्रेयस अय्यरची कॅच सोडली. त्या जीवदानाचा फायदा उचलत भारतीय कॅप्टन श्रेयस अय्यरने आपलं शतक पूर्ण केलं. वेस्ट इंडिजच्या या चूकांमुळे सामना त्यांच्या हातातून निसटला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us