
Shubman Gill Social Media Post Controversy : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. तिसऱ्यांदा किताब जिंकल्यानंतर सगळ्या देशात आनंदाचं वातावरण आहे. पण सोशल मीडियावर एक वादही सुरु झालाय. त्याने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलय. हा वादा भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कॅप्टन शुबमन गिलच्या पोस्टवरुन आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या. यात शुबमन गिल सुद्धा आहे. पण काही युजर्सचा आरोप होता की, गिलने फोटो एडिट करुन पोस्ट केला. यातून संजू सॅमसनला हटवलं.
गिलने इन्स्टाग्रामवर, टीम ट्रॉफीसह सेलिब्रेट करत असल्याचा फोटो शेअर केला. यात संजू सॅमसन दिसत नव्हता. त्यावरुन हा सर्व वाद सुरु झाला. काही फॅन्सनी सूर्यकुमार यादवच्या पोस्ट सोबत तुलना केली. त्यात सॅमसन मागे दिसत होता. गिलने फोटो एडिट करुन सॅमसनला बाहेर केलं, असा आरोप करण्यात आला. गिल सॅमसनच्या यशावर जळतो असाही आरोप झाला. कारण सॅमसनने टुर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन केलं. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळवला. तेच गिल टी20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळवू शकला नाही.
सत्य काय?
सोशल मीडियावर सुरु असलेले हे आरोप चुकीचे आहेत. सत्य यापेक्षा वेगळं आहे. फॅक्ट चेक आणि तपासातून समजतय की, गिलने काही एडिटिंग केलेलं नाही. त्या दिवशी मॅच नंतर अनेक फोटो क्लिक करण्यात आलेले. वेगवेगळ्या अँगल आणि वेगवेगळे क्षण त्यात होते. गिलने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये खेळाडूंची पोजिशन थोडी वेगळी होती. त्यामुळे संजू सॅमसन दिसत नव्हता. यशस्वी जैस्वालने सुद्धा तोच फोटो आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये पोस्ट केला. त्यातून सॅमसन दिसत नव्हता. शिवम दुबे आणि रविचंद्रन अश्विनने सुद्धा अशाच पद्धतीचा फोटो पोस्ट केला. सूर्यकुमार यादवचा फोटो वेगळ्या वेळेचा होता. ज्यात सॅमसन बुमराहच्या पाठी दिसत होता. गिलच्या फोटोत पोडियमवर खेळाडूंची व्यवस्था आणि ट्रॉफीची पोजिशन वेगळी आहे.
त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला
संजू सॅमसन या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरला. त्याने फक्त 5 सामन्यात 321 धावा केल्या. या दरम्यान त्याने नाबाद 97, 89,89 धावा करुन टीमला चॅम्पियन बनवलं. संजू सॅमसनला भले सुरुवातीला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण टुर्नामेंटच्या मध्येच त्याला संधी मिळाली, त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला.