AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : 2 गट, 8 संघ आणि 19 सामने, आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, सुरुवात केव्हापासून?

Asia Cup 2025 19 Matches Full Schedule and Venue : आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीत 8 संघांमध्ये 12 सामने खेळवण्यात येणार आहे. तसेच 15 सप्टेंबरला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. पाहा वेळापत्रक.

Asia Cup 2025 : 2 गट, 8 संघ आणि 19 सामने, आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, सुरुवात केव्हापासून?
Asia Cup 2025 ScheduleImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jul 26, 2025 | 10:10 PM
Share

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर आशिया कप 2025 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी 25 जुलैला सोशल मीडियावर पोस्ट करत स्पर्धेच्या प्रमुख तारखा जाहीर केल्या होत्या. तसेच संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांनी एसीसीने एक्स या सोशल मीडिया हँडलवरुन संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

2 ग्रुप आणि 8 टीम

एसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान स्पर्धेचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातून अव्वल 2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.

त्यानंतर सुपर 4 मध्ये पोहचलेल्या एकाच गटातील 2 अव्वल संघांचा एकमेकांविरुद्ध 1 सामना (A1 vs A2)  (B1 vs B2) होईल.तर त्यानंतर गटातील 1 संघ दुसऱ्या गटातील 2 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळेल. त्यानंतर अंतिम फेरी आणि विजेता निश्चित होईल.

टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

बहुप्रतिक्षित स्पर्धेत इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहे.

19 सामने, 8 संघ आणि 1 ट्रॉफी

आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक

  1. पहिला सामना, 9 सप्टेंबर, अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
  2. दुसरा सामना, 10 सप्टेंबर, भारत विरुद्ध यूएई
  3. तिसरा सामना, 11 सप्टेंबर, बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
  4. चौथा सामना, 12 सप्टेंबर, पाकिस्तान विरुद्ध ओमान
  5. पाचवा सामना, 13 सप्टेंबर, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  6. सहावा सामना, 14 सप्टेंबर, भारत विरुद्ध पाकिस्तान
  7. सातवा सामना, 15 सप्टेंबर, यूएई विरुद्ध ओमान
  8. आठवा सामना, 15 सप्टेंबर, श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग,
  9. नववा सामना, 16 सप्टेंबर, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
  10. दहावा सामना, 17 सप्टेंबर, पाकिस्तान विरुद्ध यूएई
  11. अकरावा सामना, 18 सप्टेंबर, श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
  12. बारावा सामना, 19 सप्टेंबर, भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 सामन्यांचं वेळापत्रक

  1. पहिला सामना, 20 सप्टेंबर, बी 1 विरुद्ध बी 2
  2. दुसरा सामना, 21 सप्टेंबर, ए1 विरुद्ध ए2
  3. तिसरा सामना, 23 सप्टेंबर, ए2 विरुद्ध बी1
  4. चौथा सामना, 24 सप्टेंबर, ए1 विरुद्ध बी2
  5. पाचवा सामना, 25 सप्टेंबर, ए2 विरुद्ध बी2
  6. सहावा सामना, 26 सप्टेंबर, ए1 विरुद्ध बी1
  7. अंतिम सामना, 28 सप्टेंबर

टी 20i फॉर्मेटनुसार होणार स्पर्धा

दरम्यान यंदा आशिया कप स्पर्धा टी 20I फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.