युवराज सिंगचा एक मंत्र अन् अभिषेक शर्मानं दिल्लीत वादळ आणलं, युवीनं असं काय सांगितलं?
अभिषेक शर्माच्या वादळी खेळीनंतर तो प्रचंड चर्चेत आला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्याच्या मालिकेमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याचा मेंटॉर युवराज सिंगनेही त्याला सामन्याच्या आदल्यादिवशी एक मंत्र दिला होता. काय होता तो मंत्र?

अफगाणिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मानं त्याचा आक्रमक खेळ दाखवला. पण आता आतली बातमी समोर आली आहे. अभिषेकला सामना सुरु होण्यापूर्वी आदल्याच दिवशी युवराज सिंगने एक मेसेज केलेला. त्यांनी प्रत्येक चेंडूवर मोठा शॉट खेळू नको असं सांगितलं होतं. तर सिंगल्सने खेळीची सुरुवात कर असा हा संदेश होता. पण पुढच्याच दिवशी अभिषेकनं फक्त 30 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. हे ऐतिहासिक शतक ठरलं आणि टीम इंडियानं मोठी धावसंख्याही उभारली.
अभिषेक शर्मानं अफगाणिस्ताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामध्ये असा धूमाकुळ घातला की सगळेच थक्क झाले. या सामन्यात त्याने तब्बल सात विविध रेकॉर्ड आपल्या नावावर केले. पण यासामन्याच्या आदल्या दिवशी अभिषेकला त्याचा मेंटॉर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंग याने एक मंत्र दिला होता. युवराजने अभिषेकला प्रत्येकच चेंडू हिट करण्याची आवश्यकता नाही, वेळ घे आणि सिंगल धावा काढ नंतर तू हळूहळू खेळात स्फोटक शॉट्स मारू शकतो असा हा मंत्र होता. पण त्यापूर्वी तुला सिंगल- डबल धावा घेत राहायचंय आणि स्ट्राइक रोटेट करायची आहे असं त्याने अभिषेकला सांगितलं होतं.
अभिषेकने सांगितलं की, मला मंत्र मिळालेला की मला प्रत्येक चेंडूवर ताकदीने खेळायचं नाही, खासकरुन तेव्हा, जेव्हा चेंडू माझ्या टप्प्यावर येत नसेल. तोपर्यंत मला सिंगल डबल करुन धावसंख्या खेळती ठेवायची आहे.
पण त्यानंतर अभिषेकने दिल्लीमध्ये वादळंच आणलं. त्याची ही खेळी अनेक वर्ष जीवंत राहणार आहे. त्याने फक्त सर्वात वेगवान शतकच नाही ठोकलं तर सोबतच संघातील खेळाडूने केलेलं हे सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी20 अर्धशतक ठरलं आहे. एवढच नाही तर त्याने हिटमॅन रोहित शर्माचाही रेकॉर्ड मोडला आहे.
दरम्यान, अभिषेकनं 108 धावा केल्या. त्याच्या या स्फोटक खेळीनंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानसमोर मोठं 221 धावांचं आव्हान ठेवलं. पण अफगाणिस्तानचा संघ मात्र केवळ 94 धावांवरच सर्वबाद झाला. अभिषेकनं या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या सामन्यात 82 आणि दुसऱ्यात 39 धावांची केळी केली.