अभिषेक शर्मा बहिणीच्या लग्नात सहभागी होणार नाही? कारण की….
अभिषेक शर्माची बहीण कोमलचा लग्न सोहळा पार पडत आहे. पण या सोहळ्याला अभिषेक शर्मा हजर राहणार नसल्याचं कळत आहे. याचं मोठं कारण समोर आलं आहे.

आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अभिषेक शर्माची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, आशिया कप स्पर्धा पार पडताच अभिषेक शर्मा कौटुंबिक सोहळ्यात रंगला. त्याच्या बहिणीचा विवाह सोहळा सुरू आहे. 3 ऑक्टोबरला कोमल शर्माचा विवाह अमृतसरमध्ये होत आहे. असं असताना अभिषेक शर्मा या विवाह सोहळ्याला गैरहजर राहण्याची शत्या आहे. कारण अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी व्यस्त झाला आहे. सध्या कानपूरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्यात खेळत आहे. त्यामुळे लग्न सोहळ्याला उपस्थित राहणं खूपच कठीण आहे. दुसरीकडे, त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्माच्या बहिणीचा विवाह लुधियानातील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबातील लविश ओबराय याच्याशी होत आहे.
अभिषेक शर्माने 30 सप्टेंबरला बहिणीच्या शगुन सोहळ्यात भाग घेतला होता. तसेच डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू युवराज सिंग या सोहळ्याला उपस्थित होता. दुसरीकडे, अभिषेक शर्माच्या लग्न सोहळ्यात एकही क्रिकेटपटू सहभागी होणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्याशिवाय भारतीय संघ अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. रिपोर्टनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे. काही दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्तीही या सोहळ्याला उपस्थित राहतील असं सांगण्यात आहे. पण मीडियाला या सोहळ्यात येण्याची परवानगी नाही.
VIDEO | Moga, Punjab: Cricketer Abhishek Sharma celebrates his sister Komal Sharma’s wedding with bhangra after Asia Cup victory.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/kcDaqzA4cu
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2025
दरम्यान, ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माचं काही एक चाललं नाही. प्रभसिमनर सिंगसोबत ओपनिंगला उतरला होता. पण त्याला खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला आहे. जॅक एडवर्ड्सच्या गोलंदाजीवर सुदरलँडने त्याचा झेल पकडत तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे अभिषेकचा आजचा दिवस काही चांगला गेला नाही असंच म्हणावं लागेल. एकीकडे बहिणीच्या लग्न सोहळ्याला मुकला. दुसरीकडे, फलंदाजीतही काही खास करू शकला नाही.
