IND vs PAK : 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान 2 क्रिकेट सामने होणार, पाहा वेळापत्रक

India vs Pakistan Cricket Match : क्रिकेट चाहत्यांना येत्या काही दिवसांत 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात एकाच दिवशी 2 टी 20 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

IND vs PAK : 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान 2 क्रिकेट सामने होणार, पाहा वेळापत्रक
India vs Pakistan
Image Credit source: ACC
| Updated on: Jan 19, 2026 | 4:48 PM

क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 देशांच्या क्रिकेट संघात होणाऱ्या सामन्याची प्रतिक्षा असते. भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. विशेष बाब म्हणजे 15 फेब्रुवारी या एकाच दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 सामने होणार आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी संघातील दुसऱ्या सामन्यात कोणते संघ एकमेकांविरुद्ध भिडणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने सोमवारी 19 जानेवारीला आशिया कप रायजिंग स्टार्स वूमन्स टी 20 स्पर्धेचं (Womens Asia Cup Rising Stars 2026) वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ भिडणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे.

कोणते संघ कोणत्या गटात?

या स्पर्धेचं आयोजन बँकॉक थायलंडमध्ये करण्यात आलं आहे. भारत ए आणि पाकिस्तान ए यांचा समावेश ए ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. तसेच या ए ग्रुपमध्ये यूएई आणि नेपाळच्या प्रमुख संघाचा समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश श्रीलंकेच्या अ संघांचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच या ग्रुपमध्ये मलेशिया आणि यजमान थायलंडच्या मुख्य संघाचा समावेश आहे.

स्पर्धेला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात

या स्पर्धेत 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान साखळी फेरीचा थरार रंगणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 3 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 असे एकूण 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

साखळी फेरीत दररोज 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार दिवसातील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यनाला स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात होईल. तर साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्याचा थरार दुपारी 2 पासून रंगणार आहे. हीच वेळ उपांत्य फेरीसाठीही असणार आहे. थायलंड वेळेबाबत भारताच्या तुलनेत 90 मिनिटांनी पुढे आहे.

त्यानंतर 20 फेब्रुवारीला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने खेळवण्यात येणार आहेत. ए 1 विरुद्ध बी 2 यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येईल. तर बी 1 विरुद्ध ए 2 सेमी फायनलमधील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने असतील. तर रविवारी 22 फेब्रुवारीला विजेता संघ निश्चित होईल. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे.

वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेचं वेळापत्रक

इंडिया ए वुमन्स टीमचं वेळापत्रक

विरुद्ध यूएई, शुक्रवार, 13 फेब्रुवारी

विरुद्ध पाकिस्तान ए, रविवार, 15 फेब्रुवारी

विरुद्ध नेपाळ ए, मंगळवार, 17 फेब्रुवारी