AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs AUS : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, सामना केव्हा आणि कुठे?

Afghanistan vs Australia Live Streaming : इंग्लंडचा थरारक सामन्यात धुव्वा उडवल्याने अफगाणिस्तानचा विश्वास वाढलेला आहे. अशात अफगाणिस्तानला आता सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र तिथे पोहचण्यासाठी अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.

AFG vs AUS : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, सामना केव्हा आणि कुठे?
afghanistan vs australia live and digital streamingImage Credit source: australia cricket and afghanistan cricket x account
| Updated on: Feb 27, 2025 | 10:14 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आता दिवसेंदिवस रंगत पाहायला मिळत आहे. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यानंतर आता बी ग्रुपमधील 3 संघात उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी 28 फेब्रुवारीला बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये कोण पोहचणार? याबाबतचं चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. अफगाणिस्तान इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहचतील. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना केव्हा?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना शुक्रवारी 28 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दरम्यान अफगाणिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये 2 पॉइंट्ससह तिसर्‍या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 3-3 पॉइंट्ससह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर इंग्लंड चौथ्या आणि शेवटच्या स्थानी आहे. इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान हे संपुष्ठात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, सीन ॲबॉट आणि सीन ॲबॉट.

अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, नांगेलिया खरोटे आणि नावेद झाद्रान.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...