
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील एकूण तिसरा आणि ए ग्रुपमधील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील पहिला सामना आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर राशिद खान याच्याकडे अफगाणिस्तानची सूत्रं आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीत दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 4 पैकी 3 सामने जिंकले, तर 1 मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. तर अफगाणिस्तानने 3 सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजकडून शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दोन्ही संघांनी सुपर 8 आधी जोरदार तयारी केली आहे. उभयसंघातील हा सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना गुरुवारी 20 जून रोजी होणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे होणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहायला मिळेल. तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवरही पाहता येईल.
अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर डिज्ने प्ल्स हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान सुधारित संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.