Nitin Gadkari: प्रियंका गांधीशी नितीन गडकरींची भेट, हास्यविनोदानंतर हाताने तयार करुन आणली ही खास डिश
Nitin Gadkari Meets Priyanka Gandhi: नितीन गडकरी जितके स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. तसेच ते राजकारणात आजतशत्रुही मानले जातात. त्याचाच प्रत्यय खासदार प्रियंका गांधी यांच्या भेटी दरम्यान आला. हास्यविनोद आणि आदरतिथ्यात त्यांनी कुठलीही कमी ठेवली नसल्याचे समोर येत आहे.

Nitin Gadkari Meets Priyanka Gandhi:राजकारण रुक्ष असतं असे चित्र आहे. मंत्र्यांच्या जीवनात खासकरुन फाईल्स, बैठका आणि गंभीर चर्चांचा राबता असतो. पण संसद परिसरात अशी एक भेट या समजाला छेद देणारी ठरली. केरळच्या वायनाड येथील खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली. वायनाड मधील काही रस्ते आणि इतर कामासंदर्भात ही भेट झाली. यादरम्यान चर्चा झाली. तसा हास्यविनोदही झाला. तर गडकरी यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी एक डिश तयार केली आणि त्यांना पदार्थांचे ताट आणून दिले. राजकारणात असे क्षण दुर्लभ झाले असताना या सुखद भेटची चर्चा देशभर न झाली तर नवलच, नाही का?
प्रियंका गांधी यांनी मागितला भेटीचा वेळ?
प्रियंका गांधी या केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. तिथल्या काही रस्त्यांच्या कामानिमित्त आणि इतर काही बाबींवर चर्चा झाली. यापूर्वी गांधी यांनी संसदेत चंदीगड आणि शिमला हमरस्त्यावरील सुरक्षा भितीवर प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आणि मंत्री महोदयांना भेटीसाठी वेळ मागितला. तेव्हा नितीन गडकरी यांनी लागलीच उत्तर दिले. ते म्हणाले की आगाऊ वेळ नोंदवण्याची गरज नाही. त्या त्यांना थेट येऊन भेटू शकतात. प्रश्नकाळ संपल्यानंतर प्रियंका गांधी या गडकरी यांच्या कार्यालयात पोहचल्या. त्यांनी वायनाड आणि केरळमधील सहा महामार्गावर चर्चा केली. त्यावर हे महामार्ग केरळ राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचे गडकरी म्हणाले. याप्रकरणी त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्यात हलकेपुलके क्षणही आले. त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातील रस्त्याची कामं घेऊन आली होती. त्यांची काम केली आता तुम्ही आला आहेत, त्यामुळे भावाची कामं केली आणि बहिणीची केली नाहीत, असं तुम्ही म्हणाल, असे गडकरींनी म्हणताच एकच हश्या पिकला.
तांदळाच्या डिशची चर्चा
दरम्यान नितीन गडकरी यांनी त्यांच्यासाठी खास तयार केलेली तांदळाची डिश आणली. युट्यूबवरील एक व्हिडिओ पाहुन आपण तांदळाची ही डिश शिकल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांच्या कार्यालयात आलेल्या पाहुण्यांना राईस बॉल्ससह चटणीची मेजवाणी देण्यात आली. प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी गडकरी यांच्यासोबत राईस बॉलची चव चाखली. यावेळी वातावरणात कुठलाही तणाव वा बडेजावपणा नव्हता.

असे तयार करा राईस बॉल्स
शिजवलेला भात
1/2 कप बारीक पनीर
1 हिरवी मिर्ची
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
1/4 काळी मिरे
1/4 चीज
1/2 कप ब्रेडक्रम्ब्स
गोडेतेल / खाद्यतेल
अशी तयार करा डिश
भिजलेले तांदुळ एका भांड्यात घ्या. त्यामध्ये पनीर, हिरवी मिर्ची, कोंथिबीर, मीठ, काळे मिरे आणि चीज टाकून ते मिश्रण चांगले एकजीव करा
आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा
आता हे गोळे वाफाळून घ्या. त्यासाठी पाणी गरम करा. स्टीमरवर बॉल्स ठेवा. 10-12 मिनिटांपर्यंत या मिश्रणाचे गोळे वाफाळून घ्या
