
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहचलेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानचा डाव या विजयी धावांचा पाठलाग करताना 19.4 ओव्हरमध्ये 187 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानला 3 बॉलमध्ये 2 रन्सची गरज होती. तेव्हा फझलहक फारुकी नॉन स्ट्राईक एन्डवर रन आऊट झाला. अशाप्रकारे सामना बरोबरीत सुटला. अशाप्रकारे 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली सुपर ओव्हर होणार हे निश्चित झालं.
अफगाणिस्तानने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 17 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 18 धावा करायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 7 धावांची गरज होती. अशात ट्रिस्टन स्टब्स याने सिक्स लगावला. स्टब्सने मारलेल्या सिक्समुळे दक्षिण आफ्रिकेच्या 17 धावा झाल्या. अशाप्रकारे मुख्य सामन्यानंतर पहिली सुपर ओव्हरही टाय झाली.
जोवर सुपर ओव्हरचा निकाल लागत नाही तोवर सुपर ओव्हर होत राहणार, असा नियम आहे. त्यामुळे उभयसंघात दुसऱ्या सुपर ओव्हरला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने 23 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 24 धावांचं आव्हान मिळालं. मात्र अफगाणिस्तानला 19 धावांपर्यंतच पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे डबल सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवर 4 धावांनी मात करत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय साकारला.
अफगाणिस्तानने 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी अनुभवी मोहम्मद नबी याला पाठवलं. मात्र नबीने रेकॉर्ड चेज करताना निराशा केली. नबीला केशव महाराज याने टाकलेल्या पहिल्या बॉलवर एकही रन घेता आली नाही. तर केशवने दुसऱ्या बॉलवर नबीला आऊट केलं. त्यामुळे आता अफगाणिस्तानला विजयासाठी 4 बॉलमध्ये 24 रन्सची गरज होती, जे शक्य होतं मात्र सोपं नाही. मात्र रहमानुल्लाह गुरुबाज याने कमाल केली.
डबल सुपर ओव्हरमध्ये काय झालं?
DOUBLE SUPER OVER! The #T20WorldCup clash between South Africa and Afghanistan was an all-time thriller!
Scorecard: https://t.co/45pet47uU9 pic.twitter.com/VacdMkyCKF
— cricket.com.au (@cricketcomau) February 11, 2026
रहमानुल्लाह याने सलग 3 बॉलमध्ये 3 सिक्स लगावले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या विजयाची आशा वाढली. अफगाणी चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. गुरुबाजने सलग 3 सिक्स ठोकल्याने केशव महाराजवर दबाव आला. आता अफगाणिस्तानला 1 बॉल आणि 6 रन्सची गरज होती. मात्र केशवने दबावात वाईड बॉल टाकला. त्यामुळे अफगाणिस्तानाला विजयासाठी सिक्सचीच गरज होती. तर सामना पुन्हा टाय करण्यासाठी फोरची गरज होती. मात्र गुरुबाजचा अंदाज चुकला आणि तो कॅच आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सामना जिंकला.