AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Afghanistan | अफगाणिस्ताकडून नंबर 1 टीम इंडियाला मोठा झटका, नक्की काय झालं?

Afghanistan Cricket Team | अफगाणिस्तान क्रिकट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने नंबर 1 असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे.

Afghanistan | अफगाणिस्ताकडून नंबर 1 टीम इंडियाला मोठा झटका, नक्की काय झालं?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 11, 2023 | 3:56 PM
Share

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 42 वा सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान क्रिकेट टीमवर 5 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा साखळी फेरीतील होता जो जिंकला.  तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानला शेवट गोड करण्यात अपयश आलं. अफगाणिस्तानचा या सामन्यासह वर्ल्ड कप 2023 मधील प्रवास इथेच संपला. अफगाणिस्तान टीमचा खेळलेल्या 9 पैकी 5 सामन्यात पराभव झाला. तर 4 सामन्यात विजय मिळवण्यात यळ आलं. अफगाणिस्तानने 4 पैकी 3 विजय हे विश्व विजेत्या संघाविरुद्ध मिळवले. अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आलं. मात्र अफगाणिस्तानने जाता जाता पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका दिला. अफगाणिस्तानने टीम इंडियाला मागे टाकत नंबर 1 टीम ठरली आहे.

अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या कामगिरीने सर्वांना चकीत केलं. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 वर्ल्ड कप विजेत्या संघांचा धु्व्वा उडवला. तर नेदरलँड्सवरही मात केली. अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये येण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे सर्व समीकरण चुकलं. अफगाणिस्तानला एक चूक महागात पडली. मात्र अफगाणिस्तानने टीम इंडियाला एकाबाबतीत पछाडलं आहे.

अफगाणिस्तानने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचलाय. अफगाणिस्तान टीमचे स्पिनर गोलंदाजांनी एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा विक्रम केला आहे. अफगाणिस्तानच्या स्पिनर गोलंदाजांनी याबाबतीत टीम इंडियाचा विक्रम मोडीत काढला आहे. अफगाणिस्तानच्या स्पिनर्सने या वर्ल्ड कपमध्ये 268.5 ओव्हर टाकल्या. तर टीम इंडियाच्या स्पिनर्सनी 2011 वर्ल्ड कपमध्ये 251 ओव्हर टाकल्या होत्या. अफगाणिस्तानच्या स्पिनर्सनी टीम इंडियाच्या तुलनेत 17.5 ओव्हर जास्ता टाकल्या.

एका वर्ल्ड कपमध्ये स्पिनर्सने टाकलेल्या सर्वाधिक ओव्हर

अफगाणिस्तान, 2023, 268.5 ओव्हर. टीम इंडिया, 2011, 251 ओव्हर. श्रीलंका, 2003, 233,1 ओव्हर. अफगाणिस्तान, 20189, 223.2 ओव्हर.

अफगाणिस्तान क्रकेट टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....