भारतीय संघावरील कोरोनाचं संकट गडद, रवी शास्त्रींनंतर आणखी दोघांना कोरोनाची लागण, पाचव्या कसोटीतून बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु असतानाच भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. रवी शास्त्रीनंतर आणखी दोघेजण कोरोनाबाधित आढळले आहेत.

भारतीय संघावरील कोरोनाचं संकट गडद, रवी शास्त्रींनंतर आणखी दोघांना कोरोनाची लागण, पाचव्या कसोटीतून बाहेर
रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 4:53 PM

लंडन : ओवल मैदानावर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्या दरम्यान भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. चौथ्या दिवशी  भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाने शिरकाव केला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली होती. पण पाचव्या दिवशी आणखी दोघा सदस्यांना कोरोना झाल्याने संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. शास्त्रीनंतर  बोलिंग कोच भरत अरुण आणि फिलडिंग कोच आर श्रीधर यांना कोरोना झाला आहे.

शास्त्री हे 5 सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर भरत अरुण, आर श्रीधर आणि नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण आणि श्रीधर हे देखील कोरोनाबाधित आढळे आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी दरम्यान हे सर्वजण विलगीकरणात असतील. दरम्यान या सर्वांना कोरोनाची लागण ही सामन्यादरम्यान झाली नसून एका खाजगी कार्यक्रमावेळी झाली आहे. शास्त्री हे त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अनावरणासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये असताना या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कारण या कार्यक्रमाला बाहेरुन अनेकजण आले होते.

पाचव्या कसोटीला दिग्गज फलंदाज मुकण्याची शक्यता

भारताचा दिग्गज फलंदाज आणि दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत आहे. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे. दुखापत अजून वाढू नये यासाठी रोहित विश्रांती घेत आहे. तसंच त्याच्या पायाचा X-Ray ही काढण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर नेमकी दुखापत किती आहे? हे कळणार आहे. त्यानंतरच रोहित मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) पाचव्या कसोटी सामन्यात खेळेल का? हे स्पष्ट होईल.

हे ही वाचा

मोठी बातमी : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची बाधा, आणखी चार सदस्य विलगीकरणात

IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत

(After ravi shastri bharat arun and r sridhar tested corona positive out of fifth England Test)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.