IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत

चौथा कसोटी सामना अंतिम टप्प्यात आला आहे. आज सामन्याचा निर्णय सर्वांसमोर येणार असून सामना सुरु असतानाच भारताचा महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे सामन्याबाहेर गेला आहे.

IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत
जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा

लंडन : भारत आणि इंग्लंड(India vs England) यांच्यातील चौथ्या कसोटीचा (Oval Test) आज शेवटचा दिवस आहे. अजून ही कसोटी संपण्यापूर्वीच भारतीय संघावर (Team India) मोठं संघ ओढावलं आहे. भारताचा दिग्गज फलंदाज आणि दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत आहे. रोहित सामन्याच्या मध्येच मैदानाबाहेर गेल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला असून पाचव्या सामन्यात शर्मा नसल्यास संघाच्या अडचणीत आणखीच वाढ होऊ शकते.

रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे. दुखापत अजून वाढू नये यासाठी रोहित विश्रांती घेत आहे. त्यात तो गोलंदाजी करत नसल्याने क्षेत्ररक्षणावेळी तंबूत आराम करत असून त्याच्या जागी मयांक अगरवाल क्षेत्ररक्षणासाठी आलेला आहे. चौथ्या कसोटीत अप्रतिम शतक ठोकत रोहितने आपली भूमिका चोख पार पाडली आहे. मात्र पाचव्या कसोटीतही त्याची गरज संघाला लागणार असल्याने त्याचे ठिक होणे फार गरजेचे आहे.

रोहित पाचव्या कसोटीत खेळणार का?

सध्या रोहित गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्रांती करत आहे. तसंच त्याच्या पायाचा X-Ray ही काढण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर नेमकी दुखापत किती आहे? हे कळणार आहे. त्यानंतरच रोहित मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) पाचव्या कसोटी सामन्यात खेळेल का? हे स्पष्ट होईल.

हे ही वाचा

IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO

(Rohit Sharma taking rest in fourth test due ti knee injury Indian team in tens for fifth test against england)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI