IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. इंग्लंडला विजयासाठी 291 धावांची गरज आहे. अत्यंत रंगतदार स्थितीतील या कसोटीत कोण जिंकणार? याकडे सर्वांचच लक्ष आहे.

IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत
जॉस बटलर

लंडन : चौथ्या कसोटीचा (Oval Test) आज शेवटचा दिवस आहे. अजून ही कसोटी संपायची असतानाच इंग्लंड (England) संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी मात्र वाढली आहे. मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) पाचव्या कसोटी सामन्यात नुकताच दुसऱ्यांदा वडिल झालेला खेळाडू जॉस बटलर (Jos Buttler) पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

पहिल्या तीन कसोटी सामन्यात खेळल्यानंतर बटलरने पत्नीला दुसऱ्यांदा मुल होणार असल्याने मालिकेतून माघार घेतली होती. पण आता त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला असून पत्नी आणि मुल सुखरुप असल्याने बटलर इंग्लंड संघात पाचव्या कसोटीत पुन्हा पुनरागमन करु शकतो. पण त्याला पुम्हा अंतिम 11 मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. कारण पहिल्याच तीन कसोटी सामन्यात त्याने खास कामगिरी केली नसून उलट त्याच्या जागी चौथ्या कसोटीत संघात आलेल्या ओली पोपने (Ollie Pope) 81 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे नेमकं कुणाला संघात स्थान द्यायचं? यावरुन इंग्लंड संघ व्यवस्थापन चिंतेत सापडलं आहे.

पहिल्या तीन सामन्यात बटलर ‘नापास’

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने भारताविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात अवघ्या 14 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.  25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. दरम्यान चौथ्या कसोटीमध्ये बटलर खेळला नसताना अनेकांना त्याची कसोटी कारकिर्द धोक्यात आली असे वाटत होते. त्यावेळ कर्णधार रुटने espncricinfo शी बोलताना सांगितलं,“मला नाही वाटत बटलरची कसोटी कारकीर्द इतक्यात संपेल. तो कसोटी क्रिकेटवर प्रेम करतो तसंच तो संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो लवकरच पुनरागमन करेल आणि हे संघासाठी खूप फायद्याचं ठरेल.” भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यात बटलर फलंदाज म्हणून नापास ठरला असला तरी यष्टीरक्षक म्हणून त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने तब्बल 18 झेल पकडत महत्त्वाची कामगिरी निभावली आहे.

बटलरच्या घरी रविवारी अवतरली परी

जोस बटलर नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने रविवारी पाच सप्टेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला. 2019 मध्ये बटलर पहिल्यांदा वडिल झाला होता. त्यावेळीही त्याला मुलगीच झाली होती. तिचं नाव जॉर्जिया ठेवलं होतं. आता दुसऱ्या मुलीचं नाव बटलरने मॅगी ठेवलं आहे. त्याचा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने बटलरला वडिल होण्याच्या शुभेच्छा देत त्याचा आणि मुलीचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसंच या फोटोच्या कॅप्शनमध्ये मुलीचं नाव लिहीत, ‘जॉसला मुलगी झाली आहे. रॉयल्स कुटुंबात स्वागत आहे मॅगी’ असंही लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

हे ही वाचा

जोस बटलरच्या घरी अवतरली परी, राजस्थान रॉयल्सने दिल्या खास शुभेच्छा, फोटोही केला शेअर

IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO

VIDEO : रोहितंच अप्रतिम शतक, रितीकाची Flying Kiss, व्हिडीओपाहून चाहतेही घायाळ

(Jos buttler may Comeback in England team at manchester test against india)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI