AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni IPL 2023 : सतत धोनी-धोनी नाव ऐकून अखेर कपिल देव बोलले, ‘आपण फक्त त्याच्याबद्दलच….’

MS Dhoni IPL 2023 : विचार करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे, असं धोनीने उत्तर दिलं. पुढच्या मिनी ऑक्शनसाठी अजून बराचवेळ आहे. मी चेन्नईसोबत असणार, हे धोनीने स्पष्ट केलय.

MS Dhoni IPL 2023 : सतत धोनी-धोनी नाव ऐकून अखेर कपिल देव बोलले, 'आपण फक्त त्याच्याबद्दलच....'
Kapil dev-ms dhoniImage Credit source: BCCI
| Updated on: May 29, 2023 | 1:26 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दोन टीम भिडणार आहेत. गुजरात आणि चेन्नईची टीम आमने-सामने असेल. सर्व फॅन्सच्या मनात एकच प्रश्न आहे, यावेळी आयपीएल चॅम्पियन कोण बनणार?. त्याशिवाय हा एमएस धोनीचा शेवटच सीजन आहे का? असा प्रश्न सुद्धा कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. धोनी पुढचा सीजन खेळणार का? याची चर्चा सोशल मीडियापासून मेन स्ट्रीय मीडियामध्ये आहे.

भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचे कॅप्टन कपिल देव सततच्या या प्रश्नांमुळे वैतागले सुद्धा. त्यांनी फॅन्सला सरळ प्रश्न विचारला, तुम्ही सतत धोनीबद्दलच का बोलताय? तो काय आयुष्यभर खेळणार?

कपिल देव काय म्हणाले?

आपण सर्वांनी धोनीच आभारी असलं पाहिजे. तो मागच्या 15 वर्षांपासून खेळतोय. कपिल देव यांच्यामते, धोनी पुढच्यावर्षी खेळो किंवा नको, त्याने आपल काम केलय. कॅप्टन म्हणून त्याने पुन्हा एकदा चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवलय. धोनीने पुन्हा एकदा कॅप्टनशिपच महत्व अधोरेखित केलय.

धोनी स्वत: काय म्हणाला?

धोनीला सुद्धा हा प्रश्न विचारला गेलाय, तू पुढच्या सीजनमध्ये खेळणार का?. धोनीने यावर उत्तर सुद्धा दिलं. विचार करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे, असं धोनीने उत्तर दिलं. पुढच्या मिनी ऑक्शनसाठी अजून बराचवेळ आहे. मी चेन्नईसोबत असणार, हे धोनीने स्पष्ट केलय. सेहवागच धोनीबद्दल मोठं वक्तव्य

वीरेंद्र सेहवागने सुद्धा धोनी बद्दल मोठ वक्तव्य केलय. धोनी कॅप्टन नसेल, तर मी खेळणार नाही. इम्पॅक्ट प्लेयरचा रुल धोनीला अप्लाय होत नाही. कारण तो आपल्या कॅप्टनशिपमुळे खेळतोय. आता धोनी काय निर्णय घेणार त्याची उत्सुक्ता आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.