अजय जडेजाने सांगितला मजेशीर किस्सा, प्रसादमुळे 5 मिनिटात हॉटेल रूममधून पळून गेलो! कारण…

भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचे मजेशीर किस्से समोर येत असतात. माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यानेही एक किस्सा शेअर केला आहे. कॅनडा दौऱ्यावर असताना रुम पार्टनर वेंकटेश प्रसादमुळे पाच मिनिटात रूम सोडून पळावं लागलं होतं.

अजय जडेजाने सांगितला मजेशीर किस्सा, प्रसादमुळे 5 मिनिटात हॉटेल रूममधून पळून गेलो! कारण...
अजय जडेजाने सांगितला मजेशीर किस्सा, प्रसादमुळे 5 मिनिटात हॉटेल रूममधून पळून गेलो! कारण...
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Aug 17, 2026 | 6:19 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आता समालोचकाच्या भूमिकेत आला आहे. भारत श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान समालोचन करत आहे. या दरम्यान कसोटी सामन्यात घडणाऱ्या घडामोडींचं विश्लेषण करत आहे. दुसरीकडे आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील काही किस्सेही सांगत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना न ऐकलेल्या गोष्टी ऐकण्याची आयती पर्वणी मिळाली आहे. गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अजय जडेजा याने माहिती नसलेला एक किस्सा सांगितला. टीम इंडियात असताना एका खेळाडूचा रुममेट कसा झाला होता आणि पाच मिनिटात रूम सोडली होती. त्याचा मजेशीर किस्सा ऐकून अनेकांनी हसणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चला जाणून घेऊयात हा किस्सा आहे तरी काय?

अजय जडेजाने 5 मिनिटात हॉटेल रूम बदलला!

अजय जडेजाने सांगितलं की, टीम इंडिया टोरोंटोत मालिका खेळण्यासाठी गेली होती. तेव्हा त्याचा रूम पार्टरनर माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद होता. वेंकटेश प्रसाद एकदम शिस्तप्रिय खेळाडू होता. त्याच्या अजय जडेजाचं होतं. टोरोंटोत रूम मिळाल्यानंतर अजय जडेजाने आपलं सर्व सामन इथे तिथे फेकून दिलं. त्यानंतर प्रसाद जेव्हा रूमध्ये आला तेव्हा त्याला रूमची अशी अवस्था पाहून धक्का बसला. त्याने काही वेळातच जडेजाचं अस्तव्यस्त पडलेलं सामान व्यवस्थित ठेवलं. तसेच जडेजाला सांगितलं की असं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. त्यानंतर जडेजा पाच मिनिटात रूम सोडून माजी फिरकीपटू आशिष कपूरच्या रूममध्ये गेला होता. कारण आशिष कपूरही अजय जडेजा सारखाच होता. त्यानंतर दौरा संपेपर्यंत त्याच्यासोबतच राहिला.

अजय जडेजा आणि वेंकटेश प्रसादची क्रिकेट कारकीर्द

अजय जडेजाने भारतासाठी दीर्घ काळ क्रिकेट खेळलं आहे. त्याने 15 कसोटी सामन्यात 576 धावा केल्या आहेत. तर 196 वनडे सामन्यात 6 शतकांच्या मदतीने 5359 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने एकूण 20 शतकं ठोकली आहे. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 11 शतकं आहेत. दुसरीकडे, वेंकटेश प्रसादने 33 कसोटी सामन्यात 96 विकेट घेतल्या आहे. तर 161 वनडे सामन्यात त्याच्या नावावर 196 विकेट आहेत. प्रसादने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 361 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 295 विकेट घेतल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us