आयपीएल 2025 लिलावात सर्व रेकॉर्ड निघणार मोडीत, रोहित शर्मासाठी मोजणार या फ्रेंचायझी 50 कोटी!
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींनी आपआपली रणनिती आखली आहे. कोणत्या खेळाडूंना रिलीज करायचं आणि कोणत्या खेळाडूला रिटेन करायचं यासाठी खलबतं सुरु आहेत. त्यामुळे मेगा लिलावात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघणार हे दिसत आहे. खासकरून रोहित शर्मासाठी दोन फ्रेंचायझींनी मोठी रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे.

आयपीएल मेगा लिलावासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला खेळाडूंवर बोली लागेल. त्यामुळे फ्रेंचायसी कोणते खेळाडू रिलीज करणार आणि कोणत्या खेळाडूंना प्राधान्य देणार याकडे लक्ष लागून आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर सर्वांचं लक्ष रोहित शर्माकडे लागून आहे.मुंबई इंडियन्स फ्रेंचायसी रोहित शर्माला रिलीज करू शकते, अशा बातम्या समोर येत आहेत. कारण मागच्या पर्वात त्याच्याकडे कर्णधारपद नव्हतं. रोहित शर्माकडील कर्णधारपद मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे सोपवलं होतं. रोहित शर्माची मैदानातील रणनिती आणि आयपीएलमधील वर्चस्व पाहता त्याच्यावर मोठा डाव लावण्यासाठी फ्रेंचायसी रणनिती आखत आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी रोहित शर्मासाठी खास प्लान आखल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्मा लिलावात उतरला तर या दोन फ्रेंचायसी वाटेल ती रक्कम मोजण्यासाठी तयार असल्याचा मिडिया रिपोर्ट आहे.
रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन फ्रेंचायझींनी रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये मोजण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या दोन फ्रेंचायझीमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे आयपीएल इतिहासात मोठा विक्रम रचला जाण्याची शक्यता आहे. पण रोहित शर्मा मुंबई इंडियन्स रिलीज करणार का? इथपासून प्रश्न आहे. दुसरीकडे, रिलीज केलं तर त्याच्यासाठी मोठी बोली लागणार हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही फ्रेंचायझींनी अद्याप एकाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही फ्रेंचायझींची त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे.
🚨 Big Breaking 🚨
According to Rohit juglan ( Rev sportz ) Delhi capitals and LSG have already saved a purse of 50 crore only for Rohit Sharma 🥶
They only want confirmation from Rohit Sharma pic.twitter.com/g3AXHrQfbL— Vishu (@Ro_45stan) August 23, 2024
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण आयपीएलमध्ये खेळणार आहे. दुसरीकडे वनडे आणि कसोटीतही रोहित शर्माची फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात नुकताच श्रीलंका दौरा पार पडला. मात्र टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सध्या रोहित शर्मा आराम करत आहे. देशांतर्गत दुलिप ट्रॉफी स्पर्धेतही खेळताना दिसणार नाही. थेट बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात त्याची बॅट तळपणार आहे.