AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्स कोलकाता सामना सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकात काय झालं?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघांनी समान धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

IPL 2026, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्स कोलकाता सामना सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकात काय झालं?
IPL 2026, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्स कोलकाता सामना सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकात काय झालं?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 26, 2026 | 11:55 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत 38वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावा दिल्या होत्या. लखनौच्या मोहसिन खानने चार षटकांत पाच फलंदाजांना बाद करत विक्रम रचला. त्याने 4 षटकात 23 धावा देत 5 विकेट काढल्या. यापूर्वी मार्क वूडने 14 धावांत 5 बळी घेऊन हा पराक्रम केला होता. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकात्याच्या धावगतीला ब्रेक लागला.  पण विजयासाठी दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा घाम निघाला. धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला 155 धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

शेवटच्या षटकात काय झालं?

लखनौ सुपर जायंट्सला सहा चेंडूत 17 धावांची गरज होती. लखनौकडून हिम्मत सिंह आणि मोहम्मद शमी मैदानात होते. कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटचं षटक कार्तिक त्यागीच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमीने एक धाव घेतली आणि हिम्मत सिंहला स्ट्राईक दिली. पण दुसरा चेंडू टाकताना कार्तिक त्यागीने चूक केली आणि त्याने नो बॉल टाकला. त्यामुळे या चेंडूवर फ्री हिट मिळाला. त्याने हा चेंडू पुन्हा टाकला आणि पंचांनी नो बॉल दिला. पण केकेआरने रिव्ह्यू घेतला आणि तो वाया गेला.  त्यानंर पुन्हा फ्री हिट मिळाला आणि हिम्मत सिंहने चौकार मारला. त्यामुळे चार चेंडूत 8 धावा अशी स्थिती आली.  हिम्मत सिंगने पुन्हा जोरदार फटका मारला पण रिंकु सिंहच्या हाती झेल देऊन बाद झाला. प्रिन्स यादव स्ट्राईकला आला आणि त्याने एक धाव घेत मोहम्मद शमीला स्ट्राईक दिली. त्यामुळे 2 चेंडू आणि 7 धावा अशी स्थिती आली.  पाचवा चेंडू निर्धाव गेला आणि एक चेंडूत सात धावा अशी स्थिती आली. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि सुपर ओव्हरमध्ये सामना गेला.

लखनौ सुपर जायंट्सचा डाव

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने विजयी धावांचा पाठलाग करताना सावध सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शची विकेट पडली. त्याचा खेळ फक्त 2 धावांवर आटोपला. त्यामुळे एडन मार्करम आणि ऋषभ पंत यांनी विकेट सांभाळून खेळ पुढे नेला. पण एडन मार्करम 27 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने कॅमरून ग्रीनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला होता. पण सीमेवर रिंकु सिंहने अप्रतिम झेल पकडला.  ऋषभ पंत 38 चेंडूत 42 धावांची खेळी करून तंबूत परतला. निकोलस पूरनचा डावही 9 धावांवर संपला. धावांचा पाठलाग करताना आयुष बडोनीने काही फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूत 24 धावा केल्या आणि बाद झाला. तर मुकूल चौधरी 1 आणि जॉर्ड लिंडे 8 धावांवर बाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्सचा डाव

कोलकाता नाईट रायडर्सचा डावाची सुरूवात निराशाजनक झाली. टिम सैफर्टच्या रुपाने दुसऱ्याच षटकात धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर अजिंक्य रहाणे 10 धावा करून तंबूत परतला. अंगकृष रघुवंशीचा डावही 9 धावांवर आटोपला. रोवमॅन पॉवेलकडून अपेक्षा होत्या मात्र त्याही भंग पावल्या. त्याचा डाव 1 धाव करून संपला. त्यामुळे संघावरील दबाव वाढत गेला. कॅमरून ग्रीन 34 धावा करून बाद झाला. तर अनुकूल रॉयला खातंही खोलता आलं नाही. रमणदीप सिंग 6 धावांवर तंबूत परतला. पण रिंकु सिंहने एका बाजूने डाव सावरला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 83 धावांची खेळी केली. त्यामुळे 150 पार धावा करता आल्या.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?