AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन

England vs India T20i Series 2026 : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 1 जुलैपासून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतून इंग्लंड संघात 3 खेळाडूंचं कमबॅक झालं आहे.

ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन
England TeamImage Credit source: @englandcricket x account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 23, 2026 | 3:12 AM
Share

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी (England vs India T20i Series 2026) 22 जून रोजी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार हॅरी ब्रूक हा टीम इंडिया विरुद्ध 5 टी 20I सामन्यांत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाची या मालिकेतून इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरूद्धच्या टी 20i मालिकेतून इंग्लंड संघात 3 स्टार खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे इंग्लंडची ताकद आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. इंग्लंडच्या या 3 खेळाडूंमध्ये सामना कोणत्याही क्षणी फिरवण्याची क्षमता आहे. हे 3 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

तिघांचं कमबॅक, कोण आहेत ते?

टीम इंडिया विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर आणि साकीब महमूद या तिघांना संधी देण्यात आली आहे. हे तिघेही काही महिन्यांआधी झालेल्या टी 20i वर्ल्ड कप संघात नव्हते. तसेच जेकब बेथल आणि सॅम करन या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. जेकबला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील शेवटच्या टप्प्यात दुखापत झाली होती. त्यामुळे जेकबला शेवटच्या टप्प्यातील काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. तर सॅम करन याला फिटनेसमुळे राजस्थान रॉयल्ससाठी खेळता आलं नाही. मात्र आता दोघांच्या कमबॅकमुळे इंग्लंडची ताकद वाढली आहे.

अनुभवी खेळाडूंमध्ये कोण?

इंग्लंडच्या टी 20i संघात अनुभवी खेळाडूही आहेत. यामध्ये जोस बटलर, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फिरकीपटू आदिल रशीद आणि फिल सॉल्ट यांचा समावेश आहे.

दोघे दुखापतीचे शिकार

तर इंग्लंडच्या 2 खेळाडूंना दुखापतीने झटका दिला आहे. वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स आणि ऑलराउंडर जेमी ओव्हरटन या दोघांची दुखापतीमुळे निवड करण्यात आलेली नाही.

1 मालिका, 5 सामने आणि 17 खेळाडू

टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जॉश टंग आणि ल्यूक वुड.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी